भविष्यातील सैनिक – स्नायपर ड्रोन्स
ह्या नवीन युगामध्ये युध्द ही फक्त युध्दभूमी पुरतीच मर्यादित (सीमित) राहिलेली नाहीत ह्या वास्तवाची जाणीव प्रत्येकालाच झालेली आहे. पारंपारिक पध्दतीची युध्द ही सायबर-युद्ध (सायबर वॉर), व्यापार-युध्द (ट्रेड वॉर), अंतराळ युद्ध (स्पेस वॉर), शहरी युध्द (अर्बन वॉर)च्या वापराने अधिक तीव्र, आक्रमक केली जात आहेत. याबरोबरच प्रगत रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ह्या संपूर्णतया नव्याने उदयास आलेल्या आधुनिक युध्दाच्या सीमावर्ती आघाड्या (युध्द रेखा) आहेत. आजमितीला बहुतांशी सर्वच क्षेत्रांमध्ये रोबोटिक्स आणि कृत्रिम