स्वस्तिक्षेम संवादम् (swastikshem-sanwad)
काल परमपूज्य बापूंनी प्रवचनामध्ये स्वस्तिक्षेम संवादम्ची संकल्पना सर्व श्रद्धावानांसमोर मांडली; सर्व श्रद्धावानांच्या हितासाठी. यामध्ये प्रत्येक श्रद्धावानाने चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी संवाद साधावयाचा आहे. श्रद्धावानाच्या मनातील भावना, विचार किंवा तो जे काही सांगू इच्छितो ते त्या त्या सदस्यासमोर त्याने मांडावयाचे आहे. प्रथम बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचना आधी, “सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते।।’ हा श्लोक म्हणतील. त्यानंतर कमीतकमी ५ मिनिटांचा काळ असेल, ज्या वेळेस प्रत्येक श्रद्धावानाने डोळे बंद करून, आपण प्रत्यक्ष