गुरुपौर्णिमा उत्सव (Gurupournima Utsav)
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ श्रीगुरुगीतेमध्ये या श्लोकाद्वारे गुरुमहिमा वर्णिला आहे. वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या महिन्याभराच्या काळास ‘श्रीगुरुचरणमास’ म्हटले जाते. गुरुपौर्णिमा हा सद्गुरुंच्या ऋणांचे स्मरण करून सद्गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! गुरुपौर्णिमेच्या पर्वावर सद्गुरुंना गुरुदक्षिणा देण्याची पद्धतही आहे. पण सद्गुरु श्रीअनिरुद्ध तर कुणाकडूनच कधीही कुठल्याही स्वरूपात काहीही स्वीकारत नाहीत. अगदी गुरुपौर्णिमेलाही ते साधी फुलाची पाकळीही स्वीकारत नाहीत. सद्गुरु बापू म्हणतात- “मला जर काही