….आणि आत्मबलच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…(And Aatmabal memories were revived)
….आणि आत्मबलच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या… आनंदाचा उत्सव आणि उत्सवाचा आनंद हे ब्रीदवाक्य घेऊन परम पूज्य नंदाईने (माझ्या लाडक्या ताईने) ५ व ६ नोव्हेंबर २०११ रोजी आत्मबल महोत्सव साकारला. अगदी मंत्रमुग्ध करणारा हा असा हा महोत्सव होता. आपल्या तेरा बॅचच्या तेराशे सख्यांना सोबत घेऊन विलोभनीय, अविश्वसनीय आणि “महा” असा महोत्सव साकारला. यासाठी नंदाईसह तिच्या सर्व लेकींनी अहोरात्र मेहनत घेतली. या काळात ताईची (नंदाई) झोप जणू नाहीशी झालेली होती. दत्तगुरु आणि