न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा…(Nahu Tuzhiya Preme Aniruddha Premsagara)
Nahu Tuzhiya Preme Aniruddha Premsagara ।। हरि ॐ ।। ’न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही “अलौकिक” प्रेमयात्रा सर्व श्रद्धावानांनी अनुभवली आणि मनाने अजूनही सर्वजण त्या दिवसाच्या आठवणींमध्ये जगत आहेत. या प्रेमयात्रेच्या महासत्संगाची सुरुवात झाली, रविवार दिनांक २६ मे २०१३ रोजी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस् अकॅडमीच्या स्टेडियमवर. सकाळपासूनच श्रद्धावानांनी मैदान भरू लागलं होत. तळपत्या उन्हाची पर्वा न करता आबालवृद्ध श्रध्दावान या प्रेमयात्रेत सहभागी होण्यासाठी उत्सुक होते. स्टेडियममध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत