साई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey
अनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला