न्हाऊ तुझिया प्रेमे – २
सद्गुरु गुणसंकीर्तनाचा महिमा अपार आहे. सद्गुरु अनिरुद्धांवरील श्रद्धावानांच्या प्रेमातूनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रद्धावानांनी ह्या भक्तिरचनांमधून त्यांच्या सद्गुरुंचे गुणसंकीर्तन केले आहे. श्रीकृष्णशास्त्री इनामदार, त्यांच्या पत्नी सुशिलाताई इनामदार, लीलाताई पाध्ये, आद्यपिपा, साधनाताई, मीनावैनी हे सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रद्धावान होते. त्यांच्या ह्या भक्तिरचनांना सूर आणि स्वरांचे कोंदण लाभले आणि ह्यातूनच जन्म झाला – ‘ऐलतीरी मी पैलतीरी तू’, ‘गाजतीया ढोल नी वाजतीया टाळ’, ‘पिपासा’, ‘वैनी म्हणे’, ‘पिपासा पसरली’,