नित्य अनिरुद्ध पौर्णिमा! (Nitya Aniruddha Pournima)

अनिरुद्ध पौर्णिमा
अनिरुद्ध
अनिरुद्ध पौर्णिमा शनिवार १डिसेंबर २०१२ रोजी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे साजरी करणार आहोत. हा दिवस प्रत्येक बापू भक्तासाठी एक विशेष पर्वणी असते. हा दिवस आपल्या बापूंचा जन्मदिवस आहे आणि श्रद्धावानांसाठी, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी आपले बापू संपूर्ण दिवस त्यांच्या मित्रांसाठी व्यतित करतात. जे मंगल आहे, शुभ आहे, जे प्रत्येक श्रध्दावानाच्या उन्‍नतीसाठी आणि उध्दारासाठी आवश्‍यक आहे ते ह्यादिवशी श्रद्धावानांना अधिक सुलभ व अधिक सहजपणे प्राप्त होते आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने श्रद्धावान ह्यादिवशी मिळणार्‍या बापूंच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेतात.
अनिरुद्धह्या सोहळ्याची सुरुवात आपल्या ए.ए.डी.एम. च्या परेडने(Parade) होते. महिला व पुरुष डी.एम.व्ही मिळून एकूण साधारण एक हजारच्या आसपास डी.एम.व्हीज्‌ च्या शिस्तबद्ध आणि सुसूत्र पद्धतीने चालणर्‍या ह्या दिमाखदार परेडची मानवंदना बापू, नंदाई आणि सुचितदादा स्वीकारतात. उपस्थित श्रद्धावानांना प्रेरणा व उत्साह देणारी अशी ही परेड असते.
श्रीरामरक्षा पठण कक्ष ही असतो. बापूंच्या देवघरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमंत ह्यांच्या मूर्तींवर अभिषेक करत असताना श्रद्धावान रामरक्षास्तोत्र पठण करतात. तसेच गार्‍हाणे ही घातले जाते. गार्‍हाणे म्हणजे आर्त अशी प्रेमाची हाक. आपल्या सद्गुरुला प्रत्यक्ष त्याच्याच उपस्थितीत अशी प्रेमाची साद घालण्याची संधी हा दिवस आपल्याला देतो.
अनिरुद्ध आर्त सादेबरोबर आरतीही! आपल्या जागेवर बसून घरून आणलेल्या तुपाच्या दिव्याने सर्व श्रद्धावान सद्‌गुरुबापूंची आरती करू शकतात. प्रत्येक तासाला म्हटल्या जाणार्‍या आरतीच्या स्वरांसमवेत मनातले आर्त व्यक्त करायचे! बापूंपर्यंत ते पोहोचतेच. हजारो ज्योतींनी एकाच वेळेस बापूंना आरती केली जाते. बापूंना औक्षण करण्याची प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारा हा दिवस!बापूंना प्रिय असलेला आप्प्यांचा नैवेद्य अर्पण करून श्रद्धावान हा प्रसाद ग्रहण करतात.
अनिरुद्ध ह्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षीपासून बापूंनी सुरु करून दिलेले 'किरातरुद्रपूजन'. प्रथम बापूंनी पूजन केले व त्यानंतर आपल्या सर्व श्रद्धावान मित्रांसाठी त्यांनी हे खुले करून दिले. आपल्या अग्रलेखांमधून वेळोवेळी बापूंनी ह्या सदाशिव-किरातरुद्राचे व त्याच्या पूजनाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. श्रद्धावानांसाठी किरातरुद्र व शिवगंगागौरी पावित्र्याला आधार देतात, त्याचा स्तंभ असतात व जे जे अनुचित अथवा अपवित्र, त्याचे स्तंभन करतात. मानवी मनाच्या जंगलातील हिंस्‍त्र पशु अर्थात षडरिपु ह्यांची शिकार करणे हा ज्याचा छंद आहे, असा हा सदाशिव राघवेन्द्र! अनिरुध्द पौर्णिमेस केलेले ह्याचे पूजन विशेष महत्त्वाचे ठरते कारण ते मानवी जीवनात वरील सर्वमंगल घडवून आणते व विकास साधून देते.
हा दिवस सर्वाथाने परिपूर्णच असतो. नामस्मरण, पूजन, अभिषेक, औक्षण, नैवेद्य आणि प्रत्यक्ष दर्शन अशी श्रद्धावानांना परवणी ठरणारा हा दिवस!
अनिरुद्ध जन्मदिवस बापूंचा पण श्रद्धावानांना भरभरून भेटही तेच आम्हाला देतात! ह्यावर्षी बापू, नंदाई व सुचितदादा ह्या तिघांच्याही आवाजात रेकॉर्ड केलेल्या स्तोत्रांची सी.डी. उपलब्ध होईल. ह्या सी.डी.बरोबर त्या स्तोत्रांची पुस्तिकाही असेल. तसेच 'साईनिवास'ची सी.डी. आता हिंदीमध्ये मिळू शकेल. साईनिवास ह्या वास्तुचे श्रद्धावानांच्या मनात विशेष असे स्थान आहेच परंतु अधिकाधिक श्रद्धावान भक्तांना ह्या सी.डी. मध्ये नमूद झालेल्या अनुभवांचा, गुणसंकीर्तनाचा आनंद मिळेलच पण सौ. मीनावैनींच्या आठवणींमधून मार्गदर्शनही मिळेल व ते ही सर्वांनाच सहज समजणार्‍या भाषेत.
ह्या दिवसाला "अनिरुद्धपौर्णिमा" असे नाव सौ. मीनावैनींनीच दिले. ही पौर्णिमा 'अनिरुद्ध' आहे कारण ह्याचा प्रकाश अनिरुद्धाच्या प्रेमाचा असा शीतल प्रकाश आहे, जो प्रत्येक श्रद्धावान भक्ताच्या मनामध्ये, जीवनामध्ये पोहोचतोच. दु:खाचे रुपांतर आनंद व धैर्यात करणारा हा प्रकाश आहे म्हणून मीना वैनी म्हणतात, "आता कैसी अमावास्या l नित्य अनिरुध्द पौर्णिमा".
सर्व श्रद्धावानांना अनिरुद्ध पौर्णिमेच्या अनिरुद्ध शुभेच्छा
ll हरि ll