‘न्हाऊ तुझिया प्रेमे - २’ बाबत सूचना

सद्गुरु श्री अनिरुद्धांवरील श्रद्धावानांच्या प्रेमातून अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रद्धावानांनी त्यांच्या भक्तिरचनांमधून सद्गुरु श्री अनिरुद्धांचे गुणसंकीर्तन केले आहे. ह्यातील निवडक भक्तिरचनांचा सत्संग करावा ही संकल्पना त्रिनाथांच्या कृपेने २०१३ साली प्रत्यक्षात आली, ती ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ या अनिरुद्ध प्रेमयात्रेच्या स्वरूपात.

प्रार्थना ही हमारे सामर्थ्य का स्रोत है (The Prayer is the source of our strength)

‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ह्या अनिरुद्ध-प्रेमाच्या वर्षावात चिंब न्हाऊन श्रद्धावान भक्तांची मने शान्ती, तृप्ती, समाधान आणि आनन्दाने काठोकाठ भरली. पण त्याचबरोबर ‘भावभक्तीची शिरापुरी । कितीही खा सदा अपुरी । जरी आकंठ सेविली तरी । तृप्ति न परिपूर्ण कधींही ॥’ ही प्रेमपिपासासुद्धा श्रद्धावानांच्या मनात उसळत राहिली.

आणि आम्हां सर्व अनिरुद्ध-प्रेमी श्रद्धावान भक्तांची ही भक्तिकामना पूर्ण होत आहे, ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ - २ ह्या रूपात. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ - २ ह्या अनिरुद्ध-प्रेम-सत्संगाचे आयोजन दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आले आहे. स्थळ तेच आहे - पद्मश्री डॉ. डि. वाय. पाटिल स्टेडियम, नेरुळ, नवी मुंबई.

२०१३ साली ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ प्रेमयात्रेत सहभागी झालेल्या श्रद्धावान भक्तांना अनिरुद्ध-प्रेमाच्या पुन:प्रत्ययाचा आनन्द घेण्यासाठी आणि जे श्रद्धावान भक्त सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांना ह्या अनिरुद्ध-प्रेमरसात भिजण्याचा अनुभव घेण्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे.

पिपासा ३, ४ आणि ५ चे आगमन

पिपासा म्हणजे सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या प्रेमपिपासेने व्याकूळ झालेल्या, अनिरुद्ध-गुणसंकीर्तनात बेभान नाचू इच्छिणार्‍या भक्तमयुराचा टाहो. पिपासा म्हणजे स्वत:ला सर्वस्वी विसरून फक्त आणि फक्त त्या अनिरुद्ध-प्रेमसागराच्या कवेत सामावण्याकरिता उसळत धावणार्‍या नदीची उत्कटता. पिपासा म्हणजे ‘बापू भेटला ज्या क्षणी मन हे जाहले उन्मनी। माझ्या अनिरुद्ध प्रेमळा त्याला माझिया कळवळा॥’ हा जीवनमन्त्र जपणार्‍या भगीरथ भक्ताचा पुरुषार्थ.

आपण पिपासा भाग १ आणि भाग २ यांतील भक्तिरचनांद्वारे या प्रेमपिपासेचा अनुभव घेतलाच आहे. आम्हां सर्व अनिरुद्ध-प्रेमी श्रद्धावान भक्तांसाठी ही आनन्दाची बातमी आहे की लवकरच पिपासा भाग ३, ४ आणि ५ चे आगमन होत आहे. ‘पिपासा’च्या ह्याआधीच्या भक्तिरचनांप्रमाणेच ह्या रचनांमध्येसुद्धा अनिरुद्धांवरील प्रेमाचे ओथंबलेल्या अनेक भक्तिरचना आपणा सर्वांना अनिरुद्ध-प्रेमरसात चिंब भिजवणार आहेत.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Hindi