तुमच्यावर प्रेम करणार्या हृदयाला दुखवू नका
(Never Hurt The Heart That Loves You)
सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन स्वत:च्या जीवनात उचित बदल करण्यास कटिबद्द असणारा श्रद्धावान कोणत्याही वयात स्वत:चा विकास करू शकतो. श्रद्धावानाने आपल्या माणसांशी कधीही उपकाराची भाषा बोलू नये. काही कारणास्तव शारीरिक अंतर असले तरी मानसिक अंतर येऊ देऊ नका. तुमच्यावर प्रेम करणारे हृदय (Heart) दुखवू नका, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥