१. ह्या आश्विन नवरात्रोत्सवापासून परमपूज्य सद्गुरुंनी दिलेल्या नवरात्रीपूजनाच्या विशेष पद्धतीमध्ये परातीतील मृत्तीकेत (मातीत) गहू (गोधूम) पेरण्याचा विधी समाविष्ट आहे. ह्या विधीनुसार पेरण्यात येणारे गहू अंबज्ञ इष्टिकेच्या मुखासमोर न पेरता, ते इतर सर्व बाजूंनी पेरावेत, जेणेकरून नवरात्रीच्या काळात गव्हाच्या दाण्यांना फुटलेल्या तृणांनी मोठ्या आईचे मुख झाकले जाणार नाही. संदर्भासाठी सोबतचा फोटो पहावा.
२. परमपूज्य सद्गुरुंनी विशेष पद्धतीने सांगितल्याप्रमाणे व त्यानुसार मी ब्लॉगवर दिल्याप्रमाणे नवरात्रि पूजन करण्याची शुद्ध, सात्त्विक, सोपी व तरीही श्रेष्ठतम् पवित्र पद्धती सर्व श्रद्धावानांसाठी येत्या अश्विन नवरात्रिपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील विधीविधान कशा पद्धतीने असेल याची संपूर्ण माहिती माझ्या ब्लॉगवर आधीच देण्यात आली आहे. या विधिविधानात शेवटच्या (क्रमांक ३६) मुद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रद्धावानांनी जून्या पध्दतीनुसार पूजन करण्यास काहीच हरकत नाही, परंतू शुद्ध, सात्त्विक, सोप्या व तरीही श्रेष्ठतम् अशा पवित्र पद्धतीने पूजन केल्यास नवरात्रि पूजनातील त्रुटी व चूका वा व्यक्तिगत दोष यांचा परिणाम होत नाही.
काही श्रद्धावान यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने पूजन करीत आले आहेत. परंतू तरीही सद्गुरुंच्या शब्दाप्रमाणे पूजन करावे, का इतर पद्धतीने पूजन करावे हा निर्णय श्रद्धावान वैयक्तिकरित्या घेऊ शकतात.
३. आज सुरु झालेल्या आश्विन नवरात्रोत्सवामध्ये परमपूज्य सद्गुरुंनी दिलेल्या नवरात्रीपूजनाच्या विशेष पद्धतीचा अनेक श्रद्धावान लाभ घेत आहेत. ह्या नवरात्रीपूजनाच्या विधीविधानामध्ये अंबज्ञ इष्टिकेवर देवीचे डोळे, नाक व ओठ काजळाने रेखांकित करण्याचा एक उपचार समाविष्ट आहे. हे देवीचे डोळे, नाक व ओठ रेखांकित करण्यासाठी काजळाव्यतिरिक्त बुक्काही (अबीर) वापरला जाऊ शकतो ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.
४. सध्याच्या आश्विन नवरात्रोत्सवातील, परमपूज्य सद्गुरुंनी दिलेल्या विशेष पूजन पद्धतीमध्ये पहिल्या दिवशी सकाळी करावयाच्या प्रतिष्ठापना पूजनातील क्र.१९च्या उपचारानुसार झेंडूच्या फुलांची माळ परातीभोवती (अंबज्ञ इष्टिकेच्या मांडणीभोवती) अर्पण करावयाची आहे. दुसर्या दिवसापासून सायंकाळच्या नित्य पूजनामध्ये नवीन माळ अर्पण करतेवेळी, आदल्या दिवशीची माळ / माळा पूजन मांडणीत तशाच ठेवाव्यात किंवा न ठेवाव्यात हे श्रद्धावान स्वत:च्या आवडीनुसार व सोईनुसार ठरवू शकतात.
५. प्रतिष्ठापना पूजन व नित्य पूजनाच्या उपचारांनुसार, मोठ्या आईला दररोज अनुक्रमे सकाळी व सायंकाळी दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करणे आवश्यक आहे.
६. त्याचप्रमाणे दुसर्या दिवसापासून दररोज सायंकाळी करावयाच्या नित्य पूजनामध्ये पुरणा-वरणाचा व इतर भोजनपदार्थांचा नैवेद्य आपल्या इच्छेनुसार अर्पण करू शकतात. परंतु हे करत असता पूजनविधी क्र.२० मध्ये दिल्याप्रमाणे नैवेद्य अर्पण करावा.
तसेच पुनर्मिलाप पूजनामध्ये क्र.३२च्या उपचारानुसार सकाळी दूध-साखर व फक्त “पुरण” एवढाच नैवेद्य अर्पण करावा.
७. पूजनविधीमध्ये अर्पण करण्यासाठी चुनरी मिळत नसल्यास, किंवा आपल्या आवडीनुसारही, चोळीचा खण अथवा ब्लाउजपीसही अर्पण करता येईल.
हिंदी