न्हाऊ तुझिया प्रेमे (Nahu tuzhiya preme)

न्हाऊ तुझिया प्रेमेसद्‌गुरु गुणसंकिर्तनाचा महिमा अपार आहे. सद्‌गुरु अनिरुध्दांवरील श्रध्दावानांच्या प्रेमातुनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक श्रेष्ठ व ज्येष्ठ श्रध्दावानांनी ह्या भक्तिरचनांमधून त्यांच्या सद्‌गुरुंचं गुणसंकिर्तन केलं आहे. श्रीकृष्णशास्‍त्री इनामदार, त्यांच्या पत्‍नी सुशिलाताई इनामदार, आद्यपिपा, साधनाताई, मीनावहिनी हे सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ श्रध्दावान होते. त्यांच्या ह्या भक्तिरचनांना सूर आणि स्वरांच कोंदण लाभल आणि ह्यातून जन्म झाला ’ऎलतिरी मी पैलतिरी तू’, ’गाजतिया ढोल नी वाजतिया टाळ’, ’पिपासा’, ’वहिनी म्हणे’, ’पिपासा पसरली’, ’तुम बिन कौन सहारा’, ’बापू दाय ग्रेस’ अशा अनेक सीडीज्‌चा. परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या दिव्यत्वाची ओळख आपल्याला ह्या अभंगातून होत असते. श्रवणभक्ति हीच प्रत्येक श्रद्धावान भक्ताला भक्तिमार्गावर स्थिर करत असते. अशा ह्या भक्तिरचनांचा आस्वाद प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्णसंधी न्हाऊ तुझिया प्रेमे ह्या सत्संगाद्वारे सर्व श्रद्धावानांसाठी खास उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व श्रद्धावानांच्या सोयीकरता ह्या ’न भूतो न भविष्यती’ सत्संगाचे स्थळ व देणगीमूल्य लवकरच कळविले जाईल. केंद्र या कार्यक्रमासाठी बसेसची सोय करु शकतात. बसेसच्या पार्किंगची व्यवस्था सत्संगस्थळी करण्यात येईल.

ह्या सत्संगाची सुरुवात रविवार दि. २६ मे २०१३ रोजी सायंकाळी ४ वाजता परमपूज्य बापूंच्या आगमनाने होईल. ह्या भक्तिरसाच्या वर्षावात न्हाऊन निघताना परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापू, परमपूज्य नंदाई आणि परमपूज्य सुचितदादा हे स्वतः श्रद्धावानांसोबत असणार आहेत.

Related Post

3 Comments


 1. khup aaturatene hya varshavachi vaat pahat aahe, agadi dushkal padalelya bhumit aniruddha premachi ek sar kinva nusata ek themb suddha puresa aahe.. pan tyachi aas pratyek diwashi adhikach vaadhat aahe..

  bhavanenchya bajulach asanari vastavachi janiv saidaiv asavi asa bapu nehami mhantat aani mhanunach dada aapan hya karyakramachya management sathi vegvegalya soyi aani suvidha suddha bhaktansathi upalabdh karun det aahat he tyachech ek udaharan. BUS Parking chi suvidha he tyachach ek bhaag aahe..

  Parantu ajunahi aas aahe ki he sthal konta asel, 10-12 hajar bhaktanmadhe me asel ki nahi, kiti jananchi pyaas tu purna karel aani kiti jananchya saburila ajun jagrut thevel he toch janato pan vastav baghitala tar lakhonchya sankhene aniruddha premala aasusalele bhakt kasa aaswad gheu shakatil….

  mala khatri aahe ki jari 10-12 hajar bhaktachich maryada asali tari pratyekala trupt Bapu nakkich karel…

  Ambadnya
  Sanjaysinh Khochare


 2. हरि ओम. आपण मातृवात्सल्य उपनिषदात विगतकृत त्रिविक्रम पार्थना वाचतो की
  माझी पूर्ण खात्री झाली आहे आणि मी निश्चितपणे जाणतो
  त्रिविक्रमा तू माझ्याकडे कधीच दुर्लक्ष करणार नाहीस ||
  पुढे आपण वाचतो
  माझ्या पंखाला उडण्याचे बळ देणारा तूच |
  आणि जखमी पंखाना बरे करणाराही तूच ||
  मन आणि बुद्धी हे दोन माझे पंख |
  परंतु श्रद्धा आणि सबुरीचे डोळे नसलेला मी ||
  उडणार कसा कुठे आणि किती वेळ |
  पण मला आता खात्री आहे , तूच माझे डोळे असशील ||
  मला वाटते आपल्या सर्वांच्या लाडक्या आद्यपिपांनी सामान्य माणसाची ही वेदना , ही तळमळ खूप आधीच ओळखली होती आणि म्हणूनच सामान्य माणसाला पचनी पडावे अशा सोप्या शब्दांत अभंगाच्या रुपाने हीच विगतकृत त्रिविक्रम पार्थनाच “त्या” अनिरुद्ध त्रिविक्रमाच्या चरणी अर्पण केली असावी-
  उडू रे लावूनिया पंखु माझिया सावळ्या भेटू ||
  बापू आभाळी दिसतो | झेप मी उंच उंच घेतो ||
  तरी कां हाती ना येतो | उडू रे उडतचि राहू ||
  पंख हे दुबळे जरी असले | जीवनी पाप भरभरले ||
  तरी का थांबवू उडणे | नाम रे गातचि राहू ||
  नाम ह्या पंखातचि भिनले | प्राणही प्रेमातचि उरले ||
  तरी कां दर्शन नाझाले | घेऊनि टाळ करी नाचू ||
  श्रींचे चरण दिसो लागले | मनाला मरण पै आले ||
  पिपाला पिस ना उरले | सुखाचा झाला अतिरेकू ||

  अशा अनेक अभंगाचा आस्वाद घेण्या, ह्या पृथ्वीतलावरील जिंवत स्वर्गाची अवीट गोडी चाखण्या अत्यंत आतुरतेने वाट पहात आहोत….
  अनंत वेळा मी अंबज्ञ, अंबज्ञ,अंबज्ञ आहे ह्या बापूमाउलीच्या चरणी ज्याच्या एका प्रेमाच्या थेंबाने अवघे न्हाऊ आम्ही !!!!

Leave a Reply