समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्यातून ढग तयार होतात आणि त्याच ढगांमधून पडतो पाऊस, प्रत्येकाला सुखावणारा. अगदी निसर्गापासून मानवापर्यंत प्रत्येकाला. शांतता देणारा, समाधानी करणारा, सुखी करणारा.
असा हा पाऊस…….जेव्हा येतो तेव्हा त्याच्या वर्षावात चिंब भिजवून टाकतो. ह्या पावसाच्या नुसत्या येण्याच्या चाहूलीनेच जर आपल्याला आनंद होतो तर…….
जेव्हा प्रेमसागर पाऊस होऊन बरसतो तेव्हाचं काय? कारण या प्रेमसागरात पाणी प्रेमाचं, त्यापासून बनणारे ढगही प्रेमाचेच मग त्यातुन पाऊस पडणार तो प्रेमाचाच.
खरं तर सद्गुरुंच्या प्रेमाचा आणि कृपेचा असा हा पाऊस निरंतर पडतच असतो पण बर्याचदा मीच त्याला मुकतो.
म्हणुनच खास आयोजन केलेलं आहे श्रद्धावानांसाठी २६ मे २०१३ ह्या दिवशीच्या महासत्संगाचं.
ज्याला ज्याला म्हणून प्रेमसागर सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रेमात चिंब न्हाऊन निघायचं आहे अशा प्रत्येकासाठी.
कारण असा भव्य महासत्संग सोहळा असणार आहे, ‘न भूतो न भविष्यती’ असा. मग तिथे उपस्थित असणं हे आणि हेच फक्त माझ्यासाठी महत्वाचं आहे कारण हा प्रेमसागर प्रत्येकाला न्हाऊ घालायला समर्थ आहे.
कारण त्याच्या प्रेमाचा फक्त एक थेंब च माझ्यासाठी पुरेसा आहे.
गरज आहे ती फक्त माझी तिथे उपस्थित असण्याची.
Permalink
Nhau Tuziya Preme…. Aniruddha Prem Sagara………..
Hari Om, Bapuraya Ambadnya, for giving us the opportunity to be personally involved in the awesome Bhakti-Sagar Abhang with our every loving Friend & Sadguru.
It was really a awesome event & request you to make a “once more……………………….”
I would like to thanks & congratulate…. every Shraddhavan who were involved in it……… Shree Ram.
The experence when the abhang – “Hasla Maza Deve……………..” starts & our loving Bapuraya smiled…………… i dont have words to express………….
Adimate To Premal Ahes Anhiii…… ME AMBADNYA AAHE….
Permalink
hari om…. me karech khup khup khup bhagyashali ahe ki mala Bapunchya premat nhayala milale. AMBADNYA. me 26 tarkhecha program baghun alya pasun aksharshaha ek divas asa gela nahi ki BAPUnache te avismarniya roop dolyasamor ale nahi, smaran zale nahi, tase yaadhi smaran hot nhavte ase nahi, pan ek khup khup vegali attachement zaliye. mala shabdach kami padtahet…. bappuna maze koti koti koti pranam mala bapuparivarat sthan milayabaddal ani asech bapunchya charnashi jaga milu de ayushyabhar hich icchha ahe.. ME AMBADNYA AHE……… hari om….
Permalink
Kabir:
Prem Payala jo Piya, Shish Dakshina de;
Lobhi shish na de sake, Nam Prem ka le:
Kabir says that to get love of Sadguru if one has to give ones head it is still a good bargain which the greedy cannot do. We will be getting unlimited life time charge of love on 26th and we do not have to sacrifice anything except accept it.
Permalink
हरी ओम, दादा.
खरच वर्ष न वर्ष आणि जन्म आणि जन्म जाऊन सुद्धा आम्ही स्वताला कोरडेच ठेवण्याचे जणू सर्व प्रयत्न करत असतो परंतु हा परमात्मा आमच्यावर प्रेमाचा ओलावा शिंपडतच असतो. आणि आता तर तो परमात्मा तो, सदगुरु बापू, प्रेमसागरच बनून त्याच्याच प्रेमात आपल्याला चिंब भिजवून टाकायला आला आहे. बापूंचे अकारण कारुण्य कि ज्यामुळे आपल्याला हा ना भूतो ना भविष्यती याची देही – याची डोळा अनुभवायला मिळणार आहे. फेसबुक वरील अपडेट्स बघून न्हाऊ तुझिया प्रेमेची उत्सुकता आणि अधीरता वाढतच आहे. त्याच्या प्रेमाचा ओलावा सतत हृदयात राहावा हि त्याच्याच चरणी प्रार्थना!
Permalink
माझ्या बापूंचा प्रेमाचा आणि कृपेचा पाऊस हा अखंड आणि कधीही न थांबणारा असाच आहे. आणि तो जाणीवेच्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आणि मृत्यू नंतरही आपल्यासोबत आपल्या अंतरात्म्यात कायम वास्तव्य करून राहणार आहे. फक्त एकच गोष्टींची जाणीव असावी “एक विश्वास असावा पुरता करता करविता माझा परमेश्वर मायबाप अनिरुद्ध”. प्रत्येक श्वासात परमेश्वराचे चिंतन असावे, पण हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात खरच वेळेचे नियोजन कितीही केले तरी ते अपुरेच. तरीही आपण केवढे भाग्यशाली कि कोणत्याही बंधनात तो आपल्याला न अडकविता हे तो स्वताच आपल्याकडून करवून घेतोय. एवढे कष्ट करून सुद्धा माझ्या बापूंच्या चेहरा सतत ध्रुव तारा सारखा चमकत आहे. पण फरक हाच कि ध्रुव तारा कधीतरीच चमकतो पण आमचे बापू प्रत्येक पावलो पावली तेजोमय होऊन आपल्याला त्यांच्या कृपेच्या, प्रेमाच्या पावसात चिम्ब भिजवत आहेत. सदगुरूंची लीला अगाध असते, कळत न कळत कोणतीही व्यक्ती जरी त्यांच्यापासून कितीहि कोसावर असली तरी ती अनिरुद्ध चिंतनात, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्या प्रेम सागरात कृपादृष्टी पावत असते.
अंबज्ञा.
श्रीराम!!!!!
हरी ओम.
Permalink
हरि ओम दादा…खरंच…ही गरज आम्हा सर्वांची आहे. हा बापू प्रत्येकावर भरभरून प्रेम करत असतोच…पण आम्ही आमच्याच चुकांमुळे म्हणा, विकल्पांमुळे म्हणा किंवा रोजच्या कामाच्या रगाड्यात यांत्रिकपणे गुंतल्यामुळे म्हणा…आम्ही ते प्रेम अनुभवण्यापासून स्वत:च स्वत:ला वंचित करत असतो…ह्या महासत्संगाच्या निमित्ताने ह्या बापूचं आमच्यावर असलेलं प्रेम (जे आहेच) नव्याने अनुभवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. ही सुवर्णसंधी चुकवणं म्हणजे श्रद्धावानाच्या आयुष्यातील एक खूप मोठी चूक ठरू शकते असं मला वाटतं…आम्ही प्रत्येकजण २६ मेची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत…श्रीराम…अंबज्ञ.
Permalink
Hari Om……Khupach chaan sandhi sarvanna miltey………bapunchya premat bhijnyachi sandhi aani ti suddha ekdaach…………….bappachya premachi,mayachi,karunechich bhook ammha lagliya aata……
Ambadnya