न्हाऊ तुझिया प्रेमे लोगो
“न्हाऊ तुझिया प्रेमे’ (Nahu tuzhiya preme )ह्या सत्संगाला मिळणारा उदंड व वाढता प्रतिसाद लक्षात घेता, तसेच पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमची आसनव्यवस्था बघता प्रत्येक श्रद्धावान भक्ताला, त्याने ह्या स्टेडियमला असलेल्या ११ वेगवेगळ्या प्रवेशगेटपैकी नक्की कोणत्या प्रवेशगेटने आत प्रवेश करायचा आहे, हे प्रवेशिका (एन्ट्री पास) घेतानाच कळवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी प्रत्येक प्रवेशिकेवर (एन्ट्री पास) प्रवेश गेट छापणे आवश्यक आहे.
हा प्रतिसाद लक्षात घेता सत्संगाच्या दिवशी येणार्या श्रद्धावान भक्तांना कोणताही त्रास होऊ नये व त्यांना एवढ्या मोठ्या स्टेडियममध्ये सहज प्रवेश मिळावा हे अपेक्षित आहे, जेणेकरून कार्यक्रम वेळेत चालू करता येईल.
वरील सर्व गोष्टी विचारात घेता सर्व श्रद्धावान भक्तांना ही सूचना करण्यात येत आहे की त्यांना आपल्या प्रवेशिका (एन्ट्री पास) दि. १९-४-२०१३ म्हणजेच रामनवमीपासून मिळतील. कृपया सर्वांनी ह्याची नोंद घ्यावी.
मात्र तोपर्यंत सर्व श्रद्धावान भक्त आपली नावे उपासना केंद्रांवर देऊ शकतात. तसेच उपासना केंद्र ह्या श्रद्धावान भक्तांची नावे ई-मेलद्वारे वा प्रत्यक्ष दि. ११-४-२०१३ पासून सी.सी.सी. कडे पाठवू शकतात.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमची भव्यता लक्षात घेता सर्व श्रद्धावान भक्तांना ह्या सत्संगाच्या सोहळ्यात सहभागी होता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
।। हरि ॐ।।
Permalink
Hari Om Dada,
Some of us wouldn’t be able to attend this program, however it would be great to see a web-telecast of this grand event.
Please Dada we would blessed and love to watch it sitting overseas…
Ambadnya
Vijay V Gurav