विश्वाचे रहस्य त्रिविक्रम - π (Pi) (Mystery of the universe-Trivikram)

 हिंदी      English      ಕನ್ನಡ     தமிழ்    

मागील काही आठवडे परमपूज्य बापूंची प्रवचने "ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:l" ह्या श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ मंत्राच्या अंकुरमंत्रभागातील, तिसर्‍या पदावर चालू आहेत.

बापू, त्रिविक्रम, Pi, π, विश्वाचे रहस्य, 22/7, अनिरुद्ध, अनिरुद्ध बापू

ह्या प्रवचना अंतर्गत बापूंनी आपल्याला परमेश्‍वरी सूत्र (algorithms) व शुभचिन्हांची ओळख करुन दिली. या सूत्रांअंतर्गत बापूंनी आपल्याला स्कंदचिन्ह, स्वस्तिक, सृष्टीतील सूर्य व चंद्र, दीप, आरती, अशा अनेक algorithms ची तपशीलावर माहिती सांगीतली.

बापू, त्रिविक्रम, Pi, π, विश्वाचे रहस्य, 22/7, अनिरुद्ध, अनिरुद्ध बापू

त्यानंतर जुलै महिन्यामध्ये बापूंनी आपल्याला प्रवचनाची सुरुवात करताना सांगीतले की, "आज आपल्याला विश्वातील खूप मोठं रहस्य बघायचं आहे" आणि ह्या प्रवचनांमध्ये बापूंनी प्रश्‍न केला की, ’गणितातील Pi (π) हा constant (स्थिरांक) कसा निर्माण झाला?’ व त्याचे उत्तर देताना समजावून सांगितले की Pi (π) हा स्थिरांक सृष्टीत कधीच बदलत नाही आणि हा स्थिरांक म्हणजे वर्तुळाचा परिघ भागीले व्यास. हे सांगताना ह्याचा संबंध हनुमंताशी कसा आहे, ह्या हनुमंताचा ह्या वर्तुळाशी संबंध कसा आहे हे समजावून श्रीमारुती स्तोत्रातील, "ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके" या ओळीचा उल्लेखकरुन सांगितले. पुढे, ह्या वर्तुळाकृति ब्रम्हांडाला हनुमंताच्या पुच्छाचा वेढा कसा कायमच असतो हे देखील बापूंनी स्पष्ट केले.

मागील प्रवचनातील म्हणजेच, ८ ऑगस्ट २०१३च्या प्रवचनात बापूंनी Pi (π) या स्थिरांकाची तीनशेसाठ दशांशापर्यंत किंमत दाखविली. ही किंमत पाच-पाचच्या गटामध्ये (set) दाखवून ते पाच-पाचच्याच सेटमध्ये का हे विशद करुन सांगितले.

पण अनेकांचा गैरसमज असतो की २२/७ ही Pi (π)ची अचूक किंमत (exact value) आहे. पण असं नसून Pi (π) हा एक स्थिरांक आहे. ’Pi or Π is an irrational number, which means that it cannot be expressed exactly as a ratio of any two integers. Fractions such as 22/7 are commonly used as an approximation of Π; no fraction can be its exact value.’ गणितज्ञांनी आतापर्यंत दशांश चिन्हाच्या पुढे पाच दशलक्ष अंकांपर्यंत Pi (π) ची किंमत शोधली आहे.

बापू, त्रिविक्रम, Pi, π, विश्वाचे रहस्य, 22/7, अनिरुद्ध, अनिरुद्ध बापू

भारतीय अध्यात्म शास्त्रात Pi (π) ही संज्ञा त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हाने दाखविली जाते हे बापूंनी विशद केले. हे विशद करताना बापू पुढे म्हणाले की, "ह्या ब्रम्हांडाचा म्हणजेच आदिमातेने निर्माण केलेल्या विश्‍वाचा विस्तार संतुलित आहे. त्याची कक्षा (limit) हनुमंत आहे म्हणूनच तो प्रथमपुत्र (दत्तात्रेय स्वरुप शुभ्रप्रकाश) आहे व ह्या ब्रम्हांडाचा व्यास हा त्रिविक्रम (हरिहर) म्हणजेच महाविष्णु व परमशिव एकत्र; श्रीराम व हनुमंत एकत्र; शौर्य व क्षमा एकत्र असा आहे.

२२/७ ही गणितीसंख्या हे Pi (π) चे approximation म्हणजेच अंदाजे किंमत आहे म्हणजेच भौतिक जगातील सामान्य गणितात ती तशा पध्दतीने वापरली जाते.

बापूंनी सांगीतल्याप्रमाणे त्रिविक्रम हा अनंत असल्यामुळे Pi (π) या गणितीसंज्ञेची exact किंमत काढणं अशक्य आहे.