अनिरुद्ध भजन म्युजिक ॲपबाबत सूचना

हरि ॐ,

सर्व श्रद्धावानांची गुरुवारच्या ‘पिपासा-३’ आल्बमच्या प्रकाशन सोहळ्यासंबंधी उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसत आहे. त्यातच हा पिपासा-३ अल्बम ज्या ॲपच्या माध्यमातून सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहोचणार आहे, ते ‘अनिरुद्ध भजन म्युजिक’ ॲप डाऊनलोड होण्यास सुरुवातही झालेली आहे. काही श्रद्धावान ह्या ॲपच्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या आपल्या शंकाही संस्थेच्या आयटी टीमबरोबर शेअर करत आहेत. विशेषत: - ‘ह्या ॲपच्या माध्यमातून ’पिपासा-३’ अल्बम खरेदी केल्यावर तो दोन डिव्हाईसवर वापरता येईल’ असा जो उल्लेख आधीच्या नोटमध्ये आहे त्यासंबंधी काही श्रद्धावानांना शंका आहे.

हे ॲप ई-मेल आयडी वर आधारित असणार आहे. हल्ली साधारणत: अनेक जणांकडे २ मोबाईल्स; किंवा १ मोबाईल व १ टॅब; किंवा १ पर्सनल व १ ऑफिशियल अशी दोन डिव्हाईस असतात; ज्यांमध्ये ते एकाच ई-मेल आयडी ने कनेक्टेड (लॉगिन) असतात. अशा वेळेस त्या व्यक्तीला आपल्या दोन्ही डिव्हाईसवर ह्या अभंगांचा आनंद लुटता यावा हा या पाठीमागचा हेतू आहे. दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या एकेक डिव्हाईसकरता ही सुविधा देण्याचा हेतू नाही.

काही श्रद्धावान गैरसमजापोटी आपल्या पत्नीच्या/मुलाच्या/परिचितांच्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या ई-मेल आयडीने लॉगिन करीत आहेत. हे करण्यासही हरकत नाही. परंतु असे केल्यामुळे आपल्या ई-मेल आयडीवर येणार्‍या सर्व ई-मेल्स व इतर डेटाचा ॲक्सेस (उदा. गुगल कॉन्टॅक्स, ड्राईव्ह इ.) त्या व्यक्तीला मिळू शकतो हे सर्वानी लक्षात घ्यावे, व हे जाणून व समजून वरिलप्रकारे दोन वेगळ्या व्यक्तींच्या डिव्हाईसवर एकाच लॉगिनने हे ॲप वापरावे का हे ठरवावे. कारण प्रत्येकाची ही वैयक्तिक व खाजगी बाब आहे.


हरि ॐ,

गुरुवार के ‘पिपासा-३’ आल्बम के प्रकाशनसमारोह के बारे में श्रद्धावानों को होनेवाली जिज्ञासा बहुत ही ऊँचाई पर पहुँच चुकी दिखायी दे रही है। उसीमें, यह पिपासा-३ अल्बम जिस ॲप के माध्यम से सभी श्रद्धावानों तक पहुँचनेवाला है, वह ‘अनिरुद्ध भजन म्युजिक’ ॲप डाऊनलोड किये जाने की शुरुआत भी हुई है। कुछ श्रद्धावान इस ॲप की कार्यपद्धति के मामले में होनेवालीं अपनी आशंकाएँ भी संस्था की आयटी टीम के साथ शेअर कर रहे हैं। ख़ासकर - ‘इस ॲप के माध्यम से ’पिपासा-३’ अल्बम खरीदने पर उसे दो डिव्हाईसीस पर इस्तेमाल किया जा सकता है’ ऐसा जो उल्लेख पहले की नोट में किया गया था, उसके बारे में कुछ श्रद्धावानों को आशंका है।

यह ॲप ई-मेल आयडी से जुड़ा होगा। आजकल आम तौर पर कई लोगों के पास २ मोबाईल्स; या फिर १ मोबाईल और १ टॅब; अथवा १ पर्सनल और १ ऑफिशियल ऐसे दो डिव्हाईस होते हैं; जिनमें वे एक ही ई-मेल आयडी से कनेक्टेड (लॉगिन) रहते हैं। ऐसे समय वह व्यक्ति अपने दोनों डिव्हाईसीस् पर इन अभंगों का आनंद उठा सकें यह इसके पीछे का हेतु है। दो अलग अलग व्यक्तियों के एक-एक डिव्हाईस के लिए यह सुविधा प्रदान करना, यह हेतु नहीं है।

कुछ श्रद्धावान ग़लतफ़हमी की वजह से अपनी पत्नी के/बेटे के/परिचित व्यक्ति के मोबाईल पर भी यह ॲप डाऊनलोड करके, उसमें खुद के ई-मेल आयडी से लॉगिन कर रहे हैं। ऐसा करने में भी हर्ज़ नहीं है। लेकिन ऐसा करने से, अपने ई-मेल आयडी पर आनेवाले सभी ई-मेल्स तथा अन्य डेटा का ॲक्सेस (उदा. गुगल कॉन्टॅक्स, ड्राईव्ह आदि) उस व्यक्ति को मिल सकता है, इस बात पर सभी लोग ग़ौर करें; और यह जानकर तथा समझकर ही यह तय करें कि उपरोक्त पद्धति से दो अलग व्यक्तियों के डिव्हाईस पर एक ही लॉगिन से इस ॲप का इस्तेमाल करना ठीक होगा या नहीं। क्योंकि यह हर किसी की निजी और व्यक्तिगत (प्रायव्हसीकी) बात है।

।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। ।। नाथसंविध ।।