दैनिक प्रत्यक्षच्या अग्रलेखाबाबत विशेष सूचना

‘दैनिक प्रत्यक्ष’ चे कार्यकारी संपादक डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखांच्या मालिकेतिल पुढील अग्रलेख सुरु होत आहेत. हे अग्रलेख पूर्वीप्रमाणेच मंगळवार, गुरुवार आणि रविवारच्या अंकात प्रकाशित होतील.
 
सर्वप्रथम “तुलसीपत्र क्रं. ९९७ ते तुलसीपत्र क्रं. १२५१” ह्यातील कथाभागाचा सारांश तीन भागांमधे रविवार दि. २ ऑक्टोबर २०१६ , मंगळवार दि. ४ ऑक्टोबर २०१६ व गुरुवार दि. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रकाशित होइल. 
 
 त्यानंतर उर्वरित कथेची सुरुवात रविवार दिं. ९ ऑक्टोबर २०१६ पासून होईल.
 
।। हरी ओम ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।

Related Post

1 Comment


  1. हरि ॐ,

    आज सकाळी प्रत्यक्ष दैनिक हातात घेतला… विशेष सूचनेकडे लक्ष गेले..पहिले काही शब्द वाचले.. आणि मन आनंदाने बेभान नाचू लागले.. कारण *तुलसीपत्र अग्रलेख* मालिका परत सुरू होत आहे.. रोज प्रत्यक्ष हाती घेतांना ह्याच बातमीला नजर शोधत असायची.. इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ही गोड बातमी.. *गुरू*वार च्या दिवशी मिळाली.. अग्रलेख परत सुरू होत आहे *अशुभनाशिनी नवरात्री* च्या पर्वामध्ये..ह्या मागे सुद्धा निश्चितच *डॅड* ची आणि *मोठय़ा आई*ची सुंदर योजनाच आहे…
    त्या आनंदातच पुढच्याच क्षणाला पुढील विचार सुरू झाले.. अग्रलेख येण्यापुर्वी तयारी करावी लागेल.. मागचे काही अग्रलेख पुन्हा वाचावे लागतील.. जेणे करून येणारे लेख निट समजतील..
    पण ह्याची काळजी सुद्धा त्या माऊलीला आहे.. तो सर्व मनातले ओळखतो… जेव्हा पुर्ण मेसेज वाचला.. तेव्हा कळले.. अगदि सुरूवातीपासून ह्या सर्व लेखमालेतील कथाभागांचा सारांश आधी येणार आहे..
    ह्या अभाट लेखमालेचा सारांश करणे आमच्यासाठी शक्य नाही.. हे सुद्धा तो जाणतो.. तसेच कुठले तरी संदर्भ, कथा.. संवाद जे खूप आवश्यक आहे ते कळणे सुद्धा आमच्या साठी कठीण आहे ते सर्व ह्या सारांश रूपातून डॅड सहज आपल्या हाती देत आहे.. हे जाणून खरच थक्क झालो..
    तेव्हा जाणवले डॅड चे अपरंपार प्रेम.. अकारण कारूण्य.. आणि ह्या सर्वांमागील डॅड ची प्रचंड मेहनत…
    *किती हा श्रमतो माझ्यासाठी.. युगानुयुगे धावतो आहे..

    डॅड खूप खूप अंबज्ञ ? ?
    I love my Dad…
    जय जगदंब जय दुर्गे ..
    चेतनसिंह देवरे
    चेंबूर उपासना केंद्र.

Leave a Reply