मानवीय जाणीव (Human Consciousness)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी  प्रवचनात मानवीय जाणीव’ याबाबत सांगितले.

साधी साधी गोष्ट बघा, लहान मुल असतं, नुकतच जन्माला आलेलं सुद्धा, त्याच्यामध्येसुद्धा ही जाणीव तेवढ्याच प्रमाणात आहे, म्हणजे नुकतच जन्माला आलेलं बाळ असूनसुद्धा त्याला जोपर्यंत त्याची आई छातीशी धरत नाही, तोवर ते बाळ comfortable होत नाही. Science काय सांगतं आपल्याला की त्या लहान बाळाला आईच्या पोटात राहिल्यामुळे नऊ महिने, आईचे हार्ट साऊंड्स जे असतात, म्हणजे हृदयाची स्पंदनं, लबडब आवाज आहे, त्या आवाजाची पूर्णपणे जाणीव झालेली असते. त्याच्या ओळखीची जाणीव असते. त्यामुळे जेव्हा आई त्याला जवळ घेते, ओळखतो काय तो मुलगा किंवा मुलगी, जे काही असेल ते, ते बाळ काय ओळखतं, तर आईची हार्ट बीट्स ओळखतं. आईच्या हृदयाची स्पंदनं ओळखतं, ती जाणीव.

आपल्या लक्षात येईल कि जन्माला आलेल्या बाळापासून, ते अगदी मृत्युच्या दाढेत असलेल्या मनुष्यापर्यंत काय गोष्ट समानपणे आहे? एकच. शरीर बदलतं, विचार बदलतात, अवयव बदलतात, इंद्रियांची वाढ, कार्य बदलतात, मनातल्या गोष्टी बदलतात, बुद्धी बदलते, स्टेटस बदलते, स्थिती बदलते, पण एकच गोष्ट जन्मापासून मृत्युच्या क्षणापर्यंत काय आहे? प्रबळ आहे आणि समानपणे आहे, ती म्हणजे जाणीव. पटलं?

मानवीय जाणीव याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥