श्रीसाईसच्चरित वाचताना त्या ध्वनीची स्पन्दने आमच्या मनात उत्पन्न होत असतात. मोठ्याने वाचले काय किंवा मनातल्या मनात वाचले काय, ही ध्वनिस्पंदने उत्पन्न होत राहतात. मनातल्या मनात वाचण्यात तर अधिक ताकदीची स्पंदने उत्पन्न होतात. म्हणून श्रीसाईसच्चरित वाचताना ते स्वत: प्रेमाने ऐकणेदेखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून या स्पंदनांचा स्वीकार करता येईल. श्रीसाईसच्चरित कसे वाचावे याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥