विनाशकारी मनोवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी भगवंताचे सहाय्य कसे मिळवावे
(How To Attain The Help From God To Overcome Destructive Emotions)
आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चारही गोष्टी सर्व जिवांसाठी समसमान असतात, म्हणूनच या चार गोष्टींची काळजी माणसाला घ्यावी लागते. काम, क्रोध वगैरे वृत्तींवर नियन्त्रण मिळवणे माणसासाठी कठीण असते. पण जो अंबज्ञ असतो, त्याला मनावर उचित नियन्त्रण मिळवण्यासाठी भगवंताकडून सहाय्य मिळतेच. विनाशकारी मनोवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी भगवंताचे सहाय्य कसे मिळवावे, या संदर्भात सद्गुरु श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २८ नोव्हेंबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥