हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman)

हेमाडपंतांची व यवनाची भेट

हेमाडपंतांची व यवनाची भेट

 

 

 

हा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय?’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या द्वारे मार्गदर्शन करतात. ही गोष्ट प्रत्येक श्रध्दावान भक्तिंना व श्रध्दावान होऊ इच्छीणार्‍यांसाठी मार्गदर्शक ठरू शकते.

आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे ’हेमाडपंतांची व यवनाची भेट’.

English Translation:

The following incident had a significant impact on Hemandpant’s life and, in fact, gave it a new direction:

Hemadpant had never seen Sainath, or even His photograph for that matter. Inspite of Kakasaheb Dikshit’s insistence and Hemandpant’s promise to him of visiting Shirdi, Hemadpant continued to put off his visit to Shirdi, as his mind was still questioning the need and relevance of a Sadguru. However, on Nanasaheb Chandorkar’s request, Hemadpant decided to embark on his visit to Shirdi.

Sainath, knowing very well that Hemadpant would miss the train that would take him towards Shirdi and in order to keep His bhakta, Nanasaheb Chandorkar’s word and His concern and care for a bhakta who wanted to embark on the path of Sadguru bhakti, took it upon Himself to guide Hemadpant in the form of a Mohammedan gentleman. This story is like a beacon light for all Shraddhavaans, as also for those who are progressing on the path for becoming Shraddhavaans.

Therefore, our topic for today wil be “Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman”.

(Please put your comments in the Forum section instead of this post. Following is the link to the Forum: https://www.aniruddhafriend-samirsinh.com/forums/topic/hemadpant-tryst-with-mohammedan-gentleman/)

Related Post

1 Comment


 1. हरी ओम दादा ! हेमाडपंत आणि यवनाची भेट ही बाबांची एक विलक्षण लीला आहे. शिर्डीस जाण्यासाठी म्हणून निघालेल्या एक पाउल पुढे टाकणार्या हेमाडपंता साठी हा साईनाथ कसा ९९ पाउल टाकत आला.
  नाना साहेब चांदोरकर आणि हेमाड पंतांची एवढी शुद्ध crystal clear मैत्री आहे की ते एकमेकांना मध्ये काहीच किंतु परंतु ठेवत नाहीत …नाना आपली आपल्या मित्राने शिर्डीस बाबाच्या दर्शनास यावे ही आतुरता ही लपवीत नाहीत आणि हेमाड पंत आपल्या मनाची चंचलता ही लपवीत नाहीत …आणि ही शुद्ध प्रेमाची मैत्रीच हेमाड पंतांच्या चंचल झालेल्या मनाला “भावते” आनंद देते ..आणि खुणावते शिर्डीस जाण्या साठी “एक”
  पाउल टाकण्यासाठी. आणि हा मित्रांचा ही मित्र असणारा सदगुरू साईनाथ …ही चंचलता समूळ निवारण करण्याची लीला करतो. हेमाड पंत लिहितात “ तंव “तो” सुचवी वेळेवर |उतरू नका हो दादरावर | मेल न तेथे थांबवणार | बोरी बंदर गांठावे ||१२८ || होती न वेळेवर ही सूचना | मेल दादर वर मिळते ना | नकळे मग या चंचल मना | काय कल्पना उठत्या ते ||१२९||……
  दादा ! काहीसा असाच बापूचा अनुभव मला इथे आठवतो …१९९८ ला ..चिखलाच्या नंदन वनी त्यासी आनंद जाहला ..ते “दहा दिशांनी विस्कटलेली जीवनाची घडी “.. अश्या विस्मनक अवस्थेत एकदा बाबाला “साद” घातली ….घातली म्हणण्या पेक्षा …आतून कोण तरी बोलल माझ्या बाबा कडे “ बाबा ! आता एक तर वेडा होईन नाही तर मरून जाईन …बस्स ! मला एकच माहीत आहे “ शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी “…मला आता तुम्हीं पहिजेत मोठ्या भावा सारखे !! काय कस मला माहीत नाही !….त्या दिवशी गुरुवार होता ! दुसर्या दिवशी माझा चुलत भाऊ सहज म्हणाला (अक्षरशः “तंव “तो” सुचवी वेळेवर”… )“ साई धाम ची यात्रा जाते आहे “…हे शब्द कानात पडल्यावर काय कोण जाणे …वाटल बाबा बोलावता आहेत |…साई धाम म=ध्ये गेलो …आम्हाला ४ जागा ह्यव्या होत्या आणि नेमक्या “चारच “ जागा बाकी होत्या ….मागच्या जागा मिळाल्या.वडिलांना पायाचा खूप त्रास्स होता ..आई ला heavy oesterioporosis मी आणि माझी भाची …तरी ही बाबा काय ते बघूंन घेतील म्हणून गेलो..
  आई ला “मधली जागा मिळाली …कोण आल नाही आजारी म्हणून …??.पण नंतर ती व्यक्ती शिडीला पोहचली.बाबा कसे बसे १०-१५ मिनट बसून अधून मधून उभ राहत होते.
  ८ तासांचा प्रवास …पनवेल आल …breakfast नंतर ..मी walkman वर होतो अचानक पहिल नाना नाहीत ( मी त्यांना नाना म्हणायचो)…पुढे पाहिलं तर एका मुला ने त्यांना अगदी पुढची जागा दीली आहे ….अक्षरशः “तंव “तो” सुचवी वेळेवर”…त्या
  आतल्या नेच सुचवल…चल Thanks ! म्हण त्याला ! आणि काय सांगू दादा !
  आयुष्याचा Turning Point ! …तिमिरातून पसरूनिया बहु आले ते उजळीत ..तो होता माझा जीवश्य आप्त मिलिंद सिंह नाईक ….माझ्या बाबाच “बापू” रूप त्यानी मला दाखवल…..चिमणीच्या पायाला दोर बांधतात तसा माझा स ( सूचित ) आई ( नंदाइ ) आणि बाबा ( अनिरुद्धानी ) मला ओढल …अगदी कुशीत …आणि त्या दोराचे पीळ मिलिंदसिंह आणि कल्पनावीरां …..
  १) शिर्डीची रसयात्रा …पूर्ण करण्या साठी नाईक कुटुंबीय दादर वरून गिरगावात का याव
  २) नेमक्या त्याच “वेळेस” का याव..त्याच यात्रेत का याव…
  ३) आई ला जागा मिळाली तशीच नाना नाही मिळाली असती तर मी मिलीन्द्सिंह शी बोललो तरी असतो का ?
  ४) अतिशय सरळ मनाचा मित भाषी मिलीन्द्सिंह ने …नेमकी “वेळ” कशी साधली मला श्री अनिरुद्धा बद्दल सांगायची ..
  ५) ही घटना न घडता मला बापुंबद्दल कोणा कडून माहिती मिळाली असती तर ..त्या वेळच्या माझ्या वांझोट्या मी पणाने मी स्वीकारली असती का ?
  ६) माझी ही खास “आप्त” श्री बापूनी राखून ठेवली … रसयात्रे शिवाय.
  ……मातृ वात्सल्य उपनिश्दात श्री बापू सांगतात तेच सत्य “काय आणि कसे हे सर्व प्रश्नच व्यर्थ आहेत कारण ते निरर्थक आहेत. “कसे?’ हा माझा आईचा प्रांत आहे.
  साधना ताई पिपासा मध्ये लिहितात …”सुकराचे लेकुरे असणं हे त्याचा प्रारब्ध होत आणि सदगुरू भेटण हे सद्गुरूंच अकारण कारुण्य आणि परमेश्वरी इछा होती.
  पुढच्या गुरुवारी मी दिसिवाला होतो …दर्शन न घेता गेलो …ह्या माझ्या आप्तांनी ३ गुरुवार सतत का आला नाहीस ! दिस् ला नाहीस म्हणून “शुद्ध प्रेमाची” गळ घातली …आणि खरच त्यानंतरच्या गुरवारी …इथे नयनी भाव आहे “मायेचा “ सोहळा …तू मज कडे अनन्य पाही | पाहीन तुज कडे तैसाच मीही || आपकी नजरोने समजा प्यार के काबील मुज़े …..!!…..
  नानासाहेब सांगुनी गेले | त्याहूनी अधिक प्रत्यक्ष पहिले | दर्शने म्या धन्य मानले | साफल्य जाहले नयनाचे ||१३८||
  हरी ओम
  -अम्बज्ञ

Comments are closed.