गुरुवाक्य ( Guru vakya )

गुरुवाक्य ( Guru vakya )
काल श्रीसाईसच्चरितावर प्रवचन करताना बापूंनी (अनिरुद्धसिंह) पहिल्या अध्यायातील खालील ओवीचे निरुपण सुरु केले.
अखंड गुरुवाक्यानुवृत्ती l दृढ धरितां चित्तवृती l श्रध्देचिया अढळ स्थिती l स्थैर्यप्राप्ति निश्‍चळ ll
ह्या ओवीच्या पहिल्या चरणाचं निरुपण सुरु झाल. “गुरुवाक्य” म्हणजे नक्की काय? हे समजावून सांगताना बापूंनी (अनिरुद्धसिंह) साईनाथांच्या ११ वचनांचं उदाहरण दिलं. प्रत्येक वचन हे जरी साईनाथांचच असलं तरी सुध्दा ह्यातील गुरुवाक्य कोणतं हे त्यांनी सर्व श्रध्दावानांना विचारलं व प्रत्येक जण आपआपल्या परीने उत्तरं देत होता आणि शेवटी बापूंनी (अनिरुध्दसिंह) “शरण मज्‌ आला, आणि वाया गेला दाखवा दाखवा ऎसा कोणी ll”, हे साईनाथांचं गुरुवाक्य कसं हे समजावून सांगितल व त्याच बरोबर सर्व श्रध्दावानांना “गुरुवाक्य” ही संकल्पना समजावून सांगितली.
आणि मग प्रत्येक श्रध्दावानांना प्रश्‍न उभा राहिला आमच्या सद्‌गुरुंचं गुरुवाक्य कोणतं? आणि सद्‌गुरुंनी हा प्रश्‍न जाणला. आणि बापूंनी (अनिरुद्धसिंह) त्यांचं गुरुवाक्य कुठचं आणि ते केव्हा उच्चारलं गेलं हे सांगितलं. आपल्या पैकीच एक श्रध्दावान मित्र; श्री. अजयसिंह केळसकर ह्यांनी हे गुरुवाक्य बापूंनी (अनिरुद्धसिंह) आत्मबल महोत्सवादरम्यान उच्चारलेलं हे वाक्य सगळ्यांना ऎकवलं. मोठ्या प्रेमाने ते त्यांनी रेकॉर्ड करुन घेतलेलं. “मी तुला कधीच टाकणार नाही” हे बापूंनी (अनिरुद्धसिंह) त्यांच्या श्रध्दावान मित्रांना दिलेलं वचन हे ते “गुरुवाक्य”. आज अनेक श्रध्दावान मित्रांना बापूंच्या (अनिरुद्धसिंह) आवाजातील बापूंचं (अनिरुद्धसिंह) ते गुरुवाक्य आपल्याकडे असांव अशी इच्छा आहे. सगळ्या श्रध्दावान बापूभक्तांकरिता हे रेकॉर्ड केलेलं वाक्य ह्या पोस्ट बरोबर जोडत आहे.

गुरुवाक्य मोबाईल रिंगटोनच्या स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करुन डाऊनलोड करता येऊ शकेल:http://goo.gl/tP5uz

Related Post

14 Comments


 1. हरि ओम दादा,परमपुज्य सदगुरु बापूंचे पवित्र गुरुवाक्य “मी तुला कधीच टाकणार नाही” एवढे आश्वासक आणि आधार देणारे आहे.


 2. SHREE RAM DADA…
  AAPLE GURUVAKY – APLYA BAPUCHE – SHARE KELYABADDAL…

  KADHIHI ATA JEWHA PAN EKTE VATEL NA TEWHA KONIHI KADHIHI AIKU SHAKEL HE TE PAN BAPPACHYA AVAJAT..

  EK VEGLACH BAL MILT BAPUCHA AVAJ AIKLYAVAR..
  TYAT 'TYACHI'GWAHI AIKLYAVAR TAR AMACHYA PANKHAT JE BAL EKVATAT NA..KI AKHHA EVREST PAN EKA UDDANAT PAR KARUN JAU..
  LOVE U DEVA…


 3. हरि ॐ दादा,
  गुरुवारी प्रवचनात जेव्हा परम पूज्य बापूंनी सांगितले ९ वचनापैकी ‘शरण मज्‌ आला, आणि वाया गेला दाखवा दाखवा ऎसा कोणी ll’ हे साईबाबांचे गुरुवाक्य आहे ते समझावून सांगितले. मनात प्रश्न उभा राहीला आमच्या सद्‌गुरुंचं म्हणाजेच बापूंचं गुरुवाक्य कोणतं? बापूनी तेही समझाविले…. ते गुरुवाक्य- ’मी तुला कधीच टाकणार नाही’….. ह्याचे कोणाकडे रेकॉर्ड आहे का असे बापू विचारत होते….. आठवत होते की आत्मबलच्या १३ व्या पुष्पाच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्याचे चित्रीकरण केलेले होते. म्हणजे रेकॉर्ड तर केलेले असणार पण वाटले नव्हते की आता कोणाकडे ते असेल… आणि त्याचवेळी श्री. अजयसिंह केळसकर यांनी त्यांच्या मोबाईल वर सेव केलेले हे गुरुवाक्य ऐकविले. इतके छान वाटले ना ऐकायला… गुरुवाक्य आणि तेही आपल्या लाडक्या सद्‌गुरू परम पूज्य बापूंच्याच आवाजात… लगेच मनात आले आपल्याला का नाही ते रेकॉर्ड करायचे सुचले…. आणि ते परत परत ऐकायची फार ऒढ लागली होती…. मनात ठरविले की, जेव्हा अजयसिंह भेटतील तेव्हा त्यांच्याकडून ते घ्यायचे…. पण बापूनांच किती काळजी की… अशी आपल्यासारख्या सामान्य श्रद्धावानांची प्रत्येक इच्छा ते आवर्जून पूर्ण करतात… ती कशी तर…… तुम्ही तेच गुरुवाक्य मोबाईल रिंगटोनच्या स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या ब्लॉग वर दिले…….मल किती आनंद झाला ते मी शब्दात नाही सांगू शकत…..हॅटस्‌ ऑफ बापू……खूप खूप श्रीराम बापू……खूप खूप श्रीराम दादा…….

  Sangitaveera Vartak


 4. हरी ओम दादा, ही video clip शेअर केल्याबद्दल खूप खूप श्रीराम. ह्या क्लीप मुळे आपल्या बापूंच गुरुवाक्य सतत आम्हाला डोळ्यात व कानात साठवता येईल.


 5. Very small sentence but Profound meaning. Very often when difficult situations come to us for that matter to any common man he will question God.. Why me? Why this has happened. It should not have happened. A person may question whether there is God and whether God is seeing all these which is happening. We need to assert ourselves If certain things has to happen it will happen because God wishes it to happen. Man does not have any control over what is happening. But if we have faith in our God and in our Sadguru, we can be sure that he will be able to avert the worst and in many cases he will bring us out of difficulties so easily and place us in safety so effortlessly which will make us wonder How this has happened. The distance between Why to How has to be traversed through Shraddha and Saburi. Shreeram


 6. Hari om dada,

  Lots of Shreeram for posting this article on “Guruvakya” and for the video clip through which we can hear the “Guruvakya” of our beloved Sadguru, Param Pujya Bapu in his own voice. “Mee Tula Kadhich Taknaar Nahin”

  We saw this video first time during our 13th batch Aatmabal Play ..it was awesome experience..shree ram Once again.


 7. Hari Om Dada,
  Shreeram for delivering this very important summarization on गुरुवाक्य to be implemented immediately with full force to carve it on our minds and shree ram for the link of the Guruvakya in Bapu’s voice.


 8. Shreeram Dada for posting this article on “Guruvakya” and for the video clip wherein we can hear the “Guruvakya” of our beloved Sadguru, Param Pujya Bapu in his own voice. “Mee Tula Kadhich Taknaar Nahin” which literally means ” I will never forsake you”.We have been watching videos of “Anubhav Kathan” on Manasamarthyadatavid channel narrrated by our Shraddhavan friends and in each Anubhav we get to see the truth of “Guruvakya” being revealed. Shreeram once again.


 9. Hari Om Dada. Shri Ram &Thank you so much for sharing the audioclip. Just few days back we Shraddhavans were ecstatic to know that a CD of stotras in P.p.Bapu, Aai & Dada's voice will be available soon. But this audioclip is simply icing on the cake. “Shravan mahinyat shravan karnyasathi janmabharacha theva milala aahe”. “Bapu- dhanya tumche Akaran Karunya”.


 10. Shreeram Dada … its wonderful .. cant express in words … love you Bapu


 11. हरि ओम, दादा . परम पूज्य बापूंनी ०२.०८.२०१२ रोजी केलेल्या हिंदी प्रवचनातील “गुरुवाक्य” ह्यावर तुम्ही नक्की लिहालच अशी खूप इच्छा होती आणि आज सकाळी लेख वाचून खुप खुप आनंद झाला आणि त्यातच तुम्ही जी बापूंच्या आवाजातील गुरुवाक्य record आम्हा सर्वांसाठी उपलब्ध करुन दिलीत त्या बद्द्ल खरेच खुप खुप अनंत श्रीराम!!!!!!!! आज मैत्री दिवसाच्या दिनी अगदी सकाळीच आमच्या लाडक्या बापूंच्या आवाजातील ही भेट …. आणि Mobile Ringtone देऊन तुम्ही खुप मोठा खजिनाच बहाल केलात. आज खरोखरच श्रीसाईसच्चरितातील ओवीची सार्थता अनुभवली कि
  ज्यांचेनि पावलों परमार्थातें | तेंचि कीं खरे आप्त भ्राते | सोयरे नाहींत तयांपरते | ऐसें निजचित्तें मानी मी |
  दादा, खरोखरीच गुरुवाक्य बापूंच्या मुखातले परत परत ऐकत रहावे असे खुप मनापासून वाटले होते प्रवचनात ती record ऐकून आणि तुम्ही ते दिलेत त्याबद्द्ल शतश: ऋणी !!!!!!!!!
  सुनीतावीरा करंडे

Leave a Reply