‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ च्या सुखद आठवणी (Great Memories-Nahu tuziya preme)

Aniruddha Bapu - Nhau tuziya preme (न्हाऊ तुझिया प्रेमे ) (4)
न्हाऊ तुझिया प्रेमे (Nhau tuziya preme)

Great Memories-Nahu tuziya preme

आज २६ मे, प्रकर्षाने आठवण येते ती नारद जयंतीला झालेल्या ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ या कार्यक्रमाची. आज ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ कार्यक्रमाला २ वर्षे पुर्ण झाली. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ कार्यक्रम म्हटला म्हणजे प्रथम डोळ्यासमोर येते ते म्हणजे ‘बापूंचा’ आपल्या लाडक्या बाळांसाठी प्रेमाने ओथंबलेला आणि मोठ्या स्क्रिनवर दिसणारा चेहरा. सर्व श्रद्धावान त्या स्क्रिनवर दिसणारा, आपल्या लाडक्या बापूंचा चेहरा पाहून फिदाच झाले. अर्थात तो चेहरा अजुनही सर्वाच्या स्मृतितही असणारच. शिवाय ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ कार्यक्रमाच्या सी.डी. च्या रुपात आपण परत परत पाहतोच.

दोन वर्षे पुर्ण होऊन अजुनही त्या कार्यक्रमाच्या स्मृति जराही कमी झाल्या नाहीत. या कार्यक्रमासाठी अनेकांचे हातभार लागले होते आणि अनेक श्रद्धावानांनी अथक प्रयत्न केले होते. मग आपल्या लाडक्या ‘डॅडनी’ सर्वांच्या या प्रयत्नाला आशिर्वाद देऊन हा कार्यक्रम एकदम यशस्वीच नाही तर सुपर डुपर हीटच करून घेतला. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ म्हटले म्हणजे समोर येते, सर्व गायकाचे अथक प्रयत्न, कार्यकर्त्यांचा सहभाग, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम (D. Y. Patil Stadium) ज्यांनी आपल्याला दिले ते श्री विजय पाटील यांचे सहकार्य, sound & electrical कार्यकर्त्यांचे योगदान आणि सर्वात महत्वाचे सर्व श्रद्धावानांनी दिलेला उत्फुर्त प्रतिसाद, किती छान रसायन जमून आले होते. अजूनही तो दिवस समोर येतो तेव्हा प्रकर्षाने आठवते ते म्हणजे, कार्यक्रम संपला आणि सर्वांची एकदम भक्तीपूर्ण शांतता, त्यातच पडलेले पावसाचे “अवघे काही थेंब”. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुध्द प्रेमसागरा, माझ्या भक्तनायका। थेंब एक हा पुरा, अवघे नाहण्या॥’ याची खरी प्रचिती सर्वांना तेव्हा आली आणि त्या नारद जयंतीला सुरू झाली आपली सर्वांची अव्याहत आनंदयात्रा.

कार्यक्रम संपला आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत अनेक श्रद्धावानांकडून ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ सारखा परत दुसरा कार्यक्रम व्हावा याबाबत पुन्हा पुन्हा विचारणा होत होती. अशा सर्व श्रद्धावानांच्या इच्छेला बापू परवानगी तरी कशी नाकारणार? आज मला तुम्हाला कळविण्यात अतिशय आनंद होत आहे – ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ चा दुसरा कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. स्वस्तिक्षेम सवांदामध्ये आपण आपल्या ‘मोठ्या आईला’ आणि त्याच बरोबर बापू, नंदाई आणि सुचितदादांना एकच प्रार्थना करूया की, ‘न्हाऊ तुझिया प्रेमे – २’ हा कार्यक्रम लवकर होऊ देत.

ll हरि ॐ ll    ll  श्रीराम ll   ll अंबज्ञ ll

Related Post

4 Comments


 1. हरि ॐ पूज्य दादा,
  अंबज्ञ… खूप छान बातमी दिलीत तुम्ही आम्हा सर्वांना…. आम्ही सर्व जण ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ कार्यक्रमाची मजा अनुभवलेली आहे…. आम्हा सर्वांना तो कार्यक्रम खूप खूप आवडला. अगदी त्याच दिवशीपासून ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ चा दुसरा भाग व्हावा असे आवर्जून वाटत होते…. अनिरुद्ध बापू आमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि असा आणखी एखादा तरी कार्यक्रम नक्कीच होईल याची खात्री होतीच…. पण आता होईल असे वाटले नव्हते…. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ची भक्तीमय मजा जी परत एकदा अनुभवायला मिळेल… या बातमीने आम्ही सर्व जण एकदम आनंदी झालो आहोत…. जय जगदंब जय दुर्गे….
  तुम्ही सांगितल्याप्रमाणे ‘न्हाऊ तुझिया प्रेमे – २’ हा कार्यक्रम लवकर व्हावा यासाठी स्वस्तिक्षेम सवांदामध्ये आम्ही ‘मोठ्या आईला’, बापू, नंदाई आणि सुचितदादांना नक्कीच प्रार्थना करूच… आणि आतुरतेने ‘न्हाऊ तुझिया प्रेमे – २’ या कार्यक्रमाची वाट पाहू…
  अंबज्ञ… जय जगदंब जय दुर्गे….


 2. Hari Om Dada. Great. Super duper news…..happy to read….and much eagerly waiting for that one more BIG DAY…filled with forever cherishable beautiful memories…all those superb abhangas, those big LED screens, such a superbly managed huge crowd and the event as a whole…and above all of this…aplya DADchya tya dilkash adaa….black Ray Ban goggle, a chain in hand as usual, HIS Kinglike walk….ohhhhh

  Eagerly waiting. Dada, hope DAD won’t make us wait for long.

  Jai Jagdamb Jai Durge…

  Ambadnya. Ambadnya. Ambadnya.


 3. Hari Om DADA ! AMBADNYA. what a pleasant News. Its wonderful to hear it.Yes we will certainly pray in स्वस्तिक्षेम सवांदाम . The wind flowing is already now giving a feel of rythem,the heart beat is also like in music.I rem in Nursery rhymes we had a poem” spring is coming spring is coming ….How do you think I know ? I see the flowers blooming,I know it must be so……..” O ! DAD MOM DADA AMBADNYA . I Rem it will be a long team efforts ,day & Night Hard efforts …..I pray on Lotus feet of Motti AAI .JAI JAGDAMBA JAI DURGE .
  AMBADNYA DADA.

Leave a Reply