सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘देव आमची काळजी घेतो ’ याबाबत सांगितले.
आम्ही देवाला मानतो. आमच्याकडे शब्द काय असतो बघा, आम्ही देवाला मानतो. आम्ही गुरु केला आहे. देवाला मानणारे तुम्ही कोण? जर देव खरा असेल, तर तुम्ही माना किं वा न माना, फरक काय पडतो? तुमच्या मानण्यामुळे तो देव नाही आहे. तो देव आहे हे तुम्हाला काय असायला पाहिजे?
तुमच्या मानण्याचा प्रश्न नाही आहे. प्रश्न कसला आहे? ह्याच्या आधीची स्टेज बघू. देव आहे, पण आम्ही देव मानतो. आम्ही देवाला मानतो. आम्ही देवाचं करतो. वाईट काही नाही, तुम्ही काही पापात पडत नाही असे बोलल्यावर, अजिबात नाही, १०८% नाही. आपल्याला फक्त एक अभ्यास कारयचा आहे, असं बोलण्याने काय होतं? मी काही चुकतो का? आम्हाला काही अहंकार होतो का? वगैरे, असल्या फालतु गोष्टींमध्ये अजिबात पडायचं नाही. आलं लक्षामध्ये? बापू, आम्ही काय म्हणायचं मग नक्की? देव आम्हाला मानतो, बरोबर?
गोष्ट सिंपल आहे. आम्ही देवाचं करतो नाही, देव आमचं करतो. बरोबर? कुणीही तुमचं काही केलं नसेल, ह्या सगळ्यांनी मिळून तुमच्यासाठी काही केलं असेल, त्याच्या हजारो पट देव तुमच्यासाठी करत असतो. म्हणजे आम्ही देवाचं करतो, हा शब्द मात्र पुसून टाकायला हवा.
देव आमची काळजी घेतो, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥