रामायणातील सर्वांत सुन्दर काण्ड आहे- सुन्दरकाण्ड! या सुन्दरकाण्डात कथा आहे, हनुमन्ताची! अशोकवनात शोकमग्न असलेल्या सीतेचा शोक नष्ट करणारा असा हा सीताशोकविनाशन हनुमन्त. सुन्दरकाण्डात लंकादहन करून परतणार्या हनुमन्ताकडे रामासाठी सीता जो निरोप देते, त्या निरोपात एक सर्वांत सुन्दर प्रार्थना आहे- दीनदयाल बिरिदु सँभारी । हरहुँ नाथ मम संकट भारी ।। सुन्दरकाण्ड, हनुमन्त आणि त्यातील ही प्रार्थना यांबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २८ ऑक्टोबर २००४ रोजीच्या मराठी प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥