घोरकष्टोध्दरण स्तोत्र (Ghorkashtoddharan Stotra) पठण आज दिनांक (९ जुलै २०१३, आषाढ शुक्ल प्रतिप्रदा) निमित्त करावयाचे.

Ghorkashtoddharan Stotra Pathan [caption id="attachment_4454" align="aligncenter" width="343"] घोरकष्टोध्दरण स्तोत्र रचित

श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी विरचित घोरकष्टोध्दरण स्तोत्र) 
      [/caption]

परम पूज्य श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी विरचित घोरकष्टोध्दरण स्तोत्र ( http://www.aniruddhasadm.com/adm_aniruddhas.html)) यांनी आषाढ शुक्ल प्रतिप्रदा शके १८३६ या दिवशी नर्मदा किनारी श्रीक्षेत्र गरुडेश्‍वर, जिल्हा नर्मदा, गुजरात या ठिकाणी समाधी घेतली. आज त्यांची तिथीनुसार ९९वी पुण्यतिथी आहे. आषाढ प्रतिपदा २०१३ ते आषाढ प्रतिपदा २०१४ हे वर्ष प.पू. वासूदेवानंद सरस्वती यांचे समाधी शताब्दी वर्ष आहे.

आपल्या प्रत्येक श्रध्दावान मित्राने शक्यतो आजच व आज शक्य नसल्यास उद्या कमीत कमी पाच वेळा घोरकष्टोध्दरण स्तोत्राचे पठण करावे अशी परम पूज्य बापूंची इच्छा आहे. परम पूज्य वासुदेवानंद सरस्वतींच्या प्रति असलेल्या आपला कृतज्ञता भावच यातून व्यक्त होईल.

Published at Mumbai, Maharashtra.