गणेशोत्सव (Ganeshotsav)

Suchitdada

परमपूज्य बापूंनी, हे वर्ष पुढील काळासाठी उचित आखणी करण्याचे असल्याने सर्वच ठिकाणी वेगवेगळे उचित बदल केले आहेत व अजूनही करीत राहणार आहेत.

हे सर्व बदल परमपूज्य बापू शिस्तबद्ध सुसूत्रीकरण पवित्ररित्या होण्यासाठी व त्यामधून श्रद्धावानांना व श्रद्धावान सेवकांना (Volunteers) भक्ती व सेवा करताना अधिक सहजता, सुबोधता व सोपेपणा मिळावा आणि त्यांच्यावर कुठलेही दडपण किंवा ओझे किंवा भार अर्थात कष्ट असल्यास ते कमी व्हावेत ह्या हेतूने करीत आहेत.

ह्या तत्वाला अनुसरूनच परमपूज्य बापूंनी आपल्या घरच्या गणपतीच्या कार्यक्रमातही अनेक बदल घडवून आणले आहेत, जसे आगमनाची व पुनर्मिलापाची मिरवणूक रद्द करणे.

तसेच परमपूज्य बापूंनी गणपतीच्या ह्या तीन दिवसांतील त्यांची वैयक्तिक मूलार्क गणेश उपासना सुद्धा वेगळ्या वेळापत्रकानुसार आखली आहे व हे तसेच दरवर्षी चालू राहील.

त्यामुळे आतापर्यंत गणेशोत्सवाच्या प्रथम रात्री (गणेशचतुर्थी) होणारी महाआरती ह्या वर्षीपासून होणार नाही.

कृपया सर्व श्रद्धावानांनी व संबंधीतांनी ह्याची नोंद घ्यावी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Suchit Dada

तसेच गणेशोत्सवाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमांच्या झालेल्या खूप मोठ्या बदलांमुळे व त्यामागील व्हॉलन्टियर्सवरील भार कमी करण्याच्या परमपूज्य बापूंच्या हेतूमुळे हॅपी होममधील अनिरुद्ध निवासस्थानाच्या गणेशोत्सवामध्ये सेवेस आवश्यक असणार्‍या व्हॉलन्टियर्सची संख्या ५०%हून कमी झाली आहे. त्यामुळे कृपया ज्यांना सेवेची संधी मिळू शकणार नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारे तर्क-कुतर्क करून - आम्हास का वगळले ? किंवा आमची काही चूक झाली काय ? - आम्ही दूरचे झालो काय ? - बापू आमच्यावर रागावले आहेत काय ? असे विचार केल्यास त्यामुळे परमपूज्य बापूंना उपासना करताना कष्ट होतील.

त्यामुळे माझी सर्व श्रद्धावान सेवकांना विनंती आहे की परमपूज्य बापूंना कष्ट होतील असे विचार किंवा कृती किंवा उक्ती करू नये (उक्ती = बोलणे).

आपला सर्वांचा अंबज्ञ

Suchitdada Signature

 

 

 

 


सुचित
दत्तोपाध्ये