श्री जी.एन्‌. .देशपांडे ( G N Deshpande )यांचा प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमेबद्दलचा अभिप्राय

॥ हरि ॐ ॥

आदरणीय समीरदादा,

सविनय हरि ॐ

आपला २६ तारखेचा कार्यक्रम अगदी अप्रतिम होता. सहा तास कसे गेले कळलेही नाही. उकाडा, ऊन कशाचा काही त्रास होण्यासारखी अवस्था कधी आलीच नाही. कार्यक्रम सुरु होईपर्यंत बाहेरचे वातावरण थोडेसे गरम जाणवत होते. पण कार्यक्रम सुरु करुन देण्यासाठी परमपूज्य बापू गमंचावर आले आणि मग आजूबाजूला काहीच नव्हते. लोक नव्हते, स्टेडीयम नव्हते, ऊन नव्हते – काहीच नव्हते. सगळीकडे फक्त सद्‌गुरुच सद्‌गुरु भरुन राहिले होते. एक अनोखा आणि  क्वचितच मिळणारा अनुभव होत तो. या अनुभवातून जाणे हेच भाग्य – महाभाग्य! हा अनुभव आम्हाला द्यायल तुम्ही, तुमचे इतर सहकारी आणि जे कलाकार कारणीभूत झाले त्यांना धन्यवाद द्यायला माझ्याकडे शद्बच नाहीत. या अनुभवातून बाहेर यायची कुणाची इच्छाही नसेल. पण आम्ही अगदी पूर्णपणे अंबज्ञ आहोत हे निर्विवाद!

दादा, या संदर्भात एक विनंती करावीशी वाटते. तुम्ही दोन आठवड्यांपूर्वी हरिगुरुग्राममध्ये या कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हणाला होतात कि यथावकाश या कार्यक्रमाची सीडी उपलब्ध होईल. खरे तर कार्यक्रम गायली गेलेली बरीच गाणी वेगवेगळ्या सीडींमध्ये उपलब्ध आहेतच. झालेल्या कार्यक्रमाची सीडी हवी आहे ती पुन्हा, पूर्णपणे नाही तरी, त्या अनुभवातून जाता यावे यासाठी. त्यामुळे जेव्हा केव्हा ही सीडी उपलब्ध होईल तेव्हा, कोणत्या ना कोणत्या कारणाने ज्यांना कार्यक्रमाला प्रत्यक्ष येता आले नाही त्यांना हे परमपूज्य बापूंचे वरदानच असेल, पण कार्यक्रम अनुभवलेल्यानांही ती अनमोल असेल. त्यामुळेच ती पूर्णपणे समजता यावी आणि मनात एक सलग अनुभव म्हणून रुजली जावी अशी माझी फार फार इच्छा आहे. त्यामुळेच या सीडीची एक वेगळी “Collectors’ edition” तयार केली जावी असे मला वाटते. या Collectors’ edition ची किंमत साधारण सीडीपेक्षा थोडी जास्त असायलाही हरकत नाही. पण या Collectors’ edition मध्ये सीडीबरोबर एक पुस्तिका असावी असे मला वाटते आहे. या पुस्तिकेत सर्व अभंगांचे मूळ शब्द देता येतील आणि आवश्यकतेनुसार काही ठिकाणी समजण्याच्या सोयीसाठी काही शब्दार्थ, काही टीपा देता येतील. सर्व किंवा काही अभंगांवर थोडी उपोद्धातासारखी माहिती देता येईल. मुख्य म्हणजे सर्व अभंगांच्या लेखकांचा थोडक्यात परिचय द्यावा असे मला वाटते. अभंग पूर्णपणे समजून घेणे ही तो तसाच्या तसा मनात रुजण्याची पहिली पायरी असेल असे मला स्वत:च्या अनुभवावरुन वाटते, म्हणून ही सूचनावजा विनंती करावीशी वाटली. पुस्तिका लिहिण्यासाठी हवी असेल ती कोणतीही मदत करायला मी कधीही तयार आहेच. कृपया विचार करावा.

अजूनही त्याच अनुभवात,


अंबज्ञ जी.एन्‌. .देशपांडे

Related Post

4 Comments


 1. Great idea! a booklet along-with CD will definitely help. Listening to abhang after understanding the meaning will give added pleasure.

  Ambadnya


 2. हरी ओम दादा,

  देशपांडेंनी म्हटल्या प्रमाणे खरच कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि त्याची आठवण म्हणून CD निघायला हवी. त्यांची विनंती खूपच छान आहे, CD बरोबर पुस्तिका आणि त्यात अभंग आणि त्याची थोडक्यात माहिती. कृपया हि विनंती मान्य करावी.


 3. Hari Om Dada,

  Yes definitely. The book containing all abhangas is also useful for self study for all shradhavans. Truly i say each abhanga is very difficult to understand with it’s proper meaning. Repeated reading helps shradhavan to increase their BHAV towards Bapu Panchaytan.

  Ambadnya Charudatta Alawani
  Devrukh Upasana Kendra.


 4. ambandya dada ji cd apan banvinar ahot tya madhe gourang sinh jya prapane 2 abhanga madhun p p bapunch varnan karat hote tya divashi te suddhha jasa ahe tasa ala tar khup chhan hoel… hi namra vinanti…

Leave a Reply