भविष्यातील सैनिक - स्नायपर ड्रोन्स

भविष्यातील सैनिक - स्नायपर ड्रोन्स

ह्या नवीन युगामध्ये युध्द ही फक्त युध्दभूमी पुरतीच मर्यादित (सीमित) राहिलेली नाहीत ह्या वास्तवाची जाणीव प्रत्येकालाच झालेली आहे. पारंपारिक पध्दतीची युध्द ही सायबर-युद्ध (सायबर वॉर), व्यापार-युध्द (ट्रेड वॉर), अंतराळ युद्ध (स्पेस वॉर), शहरी युध्द (अर्बन वॉर)च्या वापराने अधिक तीव्र, आक्रमक केली जात आहेत. याबरोबरच प्रगत रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ह्या संपूर्णतया नव्याने उदयास आलेल्या आधुनिक युध्दाच्या सीमावर्ती आघाड्या (युध्द रेखा) आहेत. आजमितीला बहुतांशी सर्वच क्षेत्रांमध्ये रोबोटिक्स आणि कृत्रिम बुध्दिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हे मानवाची जागा व्यापत आहेत आणि त्याबरोबरीनेच संरक्षण क्षेत्रही त्यांनी काबीज केले आहे.

Image Courtesy:blogs.discovermagazine.com

‘टिकाड’ ड्रोन्स ह्या सर्व प्रकारच्या कमतरतांवर मात करतात आणि ते गर्दीच्या भागात सुध्दा, सभोवतालच्या जीवितहानीचा धोका टाळून वैयक्तिक (व्यक्तिविशिष्ट) शत्रूचा अचूकतेने भेद घेण्यास सक्षम आहेत. चांगली उड्डाण वेळ आणि विविध शस्त्रात्रांचे ताफे वाहून नेण्याची अफाट क्षमता असलेल्या टिकाडचे अजून एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वास्तविक वेळेचे रोबोटिक गिंबल, हे टिकाडला प्रत्येक गनशॉट्च्या वेळी निर्माण होणारे शॉकवेव्ह (प्रघात तरंग) शोषून घेण्यास आणि वातावरणातील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन त्याचे स्थिरीकरण करण्यास सक्षम करते. युध्दाच्या वेळी त्यातील गिंबल त्याला स्वत:च्या (टिकाडच्या) वजनापेक्षा तिपटीहून अधिक वजनाची शस्त्रास्त्रे धारण करण्याकरिता अधिक कार्यक्षम आणि विश्वसनीय बनवते.

Image Courtesy:blogs.discovermagazine.com

संरक्षण दलाला प्रगत रोबोटिक्स आणि ड्रोन्समुळे लष्कराच्या मदतीशिवाय आणि जीवितहानीचा धोका न स्वीकारता देखील, कित्येक मैलांच्या दूरीवरील लक्ष्याचा अचूक भेद घेणे हे सहज शक्य झाले आहे. इस्त्रायलच्या डिफेन्स फोर्सेसच्या दिग्गजांनी ड्युक रोबोटिक्सच्या उद्घाटनाद्वारे ‘टिकाड’ नावाच्या मल्टीरोटर स्नायपर ड्रोन्सचे डिझाईन केले जे स्नायपर रायफल्स, ग्रेनेड लॉंचर्स, मशिन गन्स ह्यासारखी विविध शस्त्रात्रे वाहून नेण्यास समर्थ आहे. प्रिडेटेर किंवा रिपर ड्रोन्ससारखे मोठे ड्रोन्स खूप अधिक काळ हालचालींसाठी सुसज्ज राहू शकतात आणि बर्‍याच मोठ्या प्रदेशांत नागरी आणि दुय्यम (अप्रत्यक्ष) दर्जाचा विध्वंस करवून, ते प्रदेश बेचिराखही (उध्वस्तही) करू शकतात. ह्या मोठ्या ड्रोन्सच्या तुलनेत, हे टिकाड ड्रोन्स पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे आहेत.

‘टिकाड’ ड्रोन्स ह्या सर्व प्रकारच्या कमतरतांवर मात करतात आणि ते गर्दीच्या भागात सुध्दा, सभोवतालच्या जीवितहानीचा धोका टाळून वैयक्तिक (व्यक्तिविशिष्ट) शत्रूचा अचूकतेने भेद घेण्यास सक्षम आहेत. चांगली उड्डाण वेळ आणि विविध शस्त्रात्रांचे ताफे वाहून नेण्याची अफाट क्षमता असलेल्या टिकाडचे अजून एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वास्तविक वेळेचे रोबोटिक गिंबल, हे टिकाडला प्रत्येक गनशॉट्च्या वेळी निर्माण होणारे शॉकवेव्ह (प्रघात तरंग) शोषून घेण्यास आणि वातावरणातील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन त्याचे स्थिरीकरण करण्यास सक्षम करते. युध्दाच्या वेळी त्यातील गिंबल त्याला स्वत:च्या (टिकाडच्या) वजनापेक्षा तिपटीहून अधिक वजनाची शस्त्रास्त्रे धारण करण्याकरिता अधिक कार्यक्षम आणि विश्वसनीय बनवते.

Image Courtesy:blogs.discovermagazine.com

याहीपेक्षा वरचढ व अधिक महत्त्वाचे म्हणजे टिकाड हे मानव नियंत्रित ड्रोन आहे, ज्याची निर्णय प्रक्रिया मानवाच्या हाती आहे आणि त्यामुळेच स्वंयचलित सिस्टीममध्ये (प्रणालीमध्ये) मानवी नियंत्रणाच्या बाहेर जाण्याच्या असलेल्या संभाव्य धोक्यापासून टिकाडला ते अधिक सुरक्षित बनविते. परंतु टिकाड ड्रोन्समध्ये शहरी युध्दांमध्ये (अर्बन कॉम्बेट्मध्ये) मानवी सैन्याची जागा घेण्याची सक्षमता (संभाव्य शक्यता) आहे. अशाप्रकारे त्याच्या निर्मात्यांनी त्याला दिलेले "भविष्यातील सैनिक" हे नाव अत्यंत समर्पक आहे. ड्युक रोबोटिक्स इनकॉर्पोरेशन ह्या स्टार्टअपचे घोषवाक्य (स्लोगन) ‘नो बूट्‌स ऑन द ग्राऊंड’ (जमिनीवर बूट नाहीत) हे, त्याचा आधुनिक युध्दाचा दृष्टीकोन अधिक ठळकपणे स्पष्ट दर्शविते.

असे निदर्शनास येते की आतापर्यंत तांत्रिकदृष्ट्या सक्षम असून देखील कोणत्याही राष्ट्राने स्वंयचलित रोबोट्‌सना(स्वायत्त रोबोट्‌सना) किंवा ड्रोन्सना प्राणघातक शस्त्रे कुठल्याही युध्दभूमीवर वापरण्याचे अधिकार वा स्वातंत्र्य प्रदान केलेले नाहीत. नुकत्याच ‘टेस्ला’च्या एलॉन मस्क आणि इतर ११६ व्यावसायिक नेत्यांनी स्वायत्त किलर रोबोट्‌स वरील केलेली बंदीची मागणी, हे त्यांनी निर्माण केलेल्या मोठ्या धोक्याकडे निर्देश करते, जी ‘युध्दातील तिसरी क्रांती’ घडविण्यास कारणीभूत ठरू शकते. ह्या धोक्याकडे अजून एका भक्कम दांडग्या विधानाने लक्ष वेधले ते म्हणजे जॅक मा ह्यांचे विधान की, कृत्रिम बुध्दीमत्ता ही "तिसरे महायुध्द" सुरु करण्यास कारणीभूत ठरू शकते.

चित्तवेधक बाब म्हणजे ड्युक रोबोटिक्सने असे दृश्यमान वर्तविले आहे की, मिलिटरी कधीतरी मानवी सैन्याची वाट मोकळी करण्यासाठी टिकाड ड्रोन्सचे झुंड (स्वार्म) वापरेल. असे सांगितले जाते कि इस्त्रायलच्या डिफेन्स मिलिटरीने टिकाड ड्रोन्सकरिता काही सुरुवातीच्या ऑर्डर्स दिल्या आहेत आणि स्टार्टपने त्याकरिता पेंटॅगॉनकडे धाव देखील घेतली आहे.

English    

हिंदी