भीती ही माणसाच्या जीवनात बुद्धीचे जडत्व निर्माण करते आणि त्यामुळे मानव बुद्धीचा वापरच करू शकत नाही. लहानपणापासून मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या भित्यांना दडपून त्यांना भित्रे बनवू नका, त्यांना भक्तीतून निर्भय बनवा. भक्तीचा पाया असला तर त्यांचे पाऊल कधीच वाकडे पडत नाही. भगवद्भक्ती करून बुद्धीला जडत्व येऊ न देता मानवाने निर्भय बनले पाहिजे, असे परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक 15 मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥