प्रत्येक जण स्वत:ची लढाई लढत असतो (Everyone is fighting their own battle)

परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘प्रत्येक जण स्वत:ची लढाई लढत असतो’ याबाबत सांगितले.

पण आम्हाला एक मात्र नीट कळावं लागतं की प्रयास कुठवर करायचे आणि कुठे थांबवायचे, हे आपल्याला कुठेतरी निर्णय घ्यावाच लागतो. नाहीतर शेवटी लक्षात घ्या, प्रत्येकाचं जीवन शेवटी स्वतंत्र आहे.

आपण कुटुंबाच्या नात्याने, मित्रत्वाच्या नात्याने आपण आपल्या धर्माच्या नात्याने, समाजाच्या नात्याने जोडलेले जरुर असू, पण मग बाकीचे हजारो लाखो लोक असतील, पण तुमच्या जीवनामधले आतील बदल तिथली कुठलीही व्यक्ति करू शकत नाही, हे आम्हाला समजलं पाहिजे.

ह्याचा अर्थ नाती तोडा मुळीच म्हणत नाही आहे मी, पण आम्हाला कळलं पाहिजे कि आमच्या जीवनामध्ये मी जो कोण काही आहे, बाकीची माणसं मला स्थूल मदत थोडीफार करू शकतील. माझ्या जीवनातले स्वतःचे प्रश्न स्वतःलाच सोडवावे लागतात. जीवनात स्वतःला सामोरं जायचं आहे.

जन्माला येतांना आपण एकटं असतो, मरतांना बाजूला शंभर माणसं उभी असली तरीही त्यातलं कोणीही तुमच्याबरोबर नसतं लक्षात ठेवा. प्रत्येकाचा आत येण्याचा ह्या मर्त्यलोकामध्ये, बाहेर जाण्याचा मार्ग पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्याचबरोबर तुमचं कर्म जे आहे, तुमची भक्ति जी आहे, ती तुमच्या बरोबरच राहते. त्याच्यामध्ये share कोणीही घेऊ शकत नाही, हे आम्हाला कळलं पाहिजे म्हणजे त्याच्यावरचा उपाय स्वतःलाच करावा लागतो.

प्रत्येक जण स्वत:ची लढाई लढत असतो, असे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी  प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥