एक विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु ऐसा (Ek Vishwas asava purta karta harta GURU aisa)

ll हरि ॐll

 
Sadguru_Shree_Aniruddha_Bapu
Sadguru Shree Aniruddha Bapu

 
 श्री साईसच्‍चरितामध्ये अनेक भक्तांच्या गोष्टी येतात ज्यामुळे भक्तांची श्रध्दा दृढ होत जाते आणि सद्‌गुरुचरणी भक्तीहीदृढ व्हायला लागते. सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या भक्तांना असे अनेक अनुभव आलेले आहेत.अनेक अनुभव विशेषांकामधून आले आहेत आणि अनेकअनुभव कृपासिंधुमध्येही येतात.त्याशिवाय हे अनुभव आपल्या “अनिरुध्द बापू व्हिडीयोज” युट्युब चॅनलवर (http://www.youtube.com/user/manasamarthyadatavid/videos?flow=grid&view=1) देखील पहायला मिळतात.हे अनुभव प्रत्येक श्रध्दावानाला मार्गदर्शक तर असतातच शिवाय सद्‌गुरुचरणी श्रध्दा आणि सबुरी दृढ करणारेही असतात.
 
ही श्रध्दा व सबुरी म्हणजे धैर्यशीलता, भक्तांच्या दृढ झालेल्या भक्तीचेप्रतीक असते. श्रीसाईसच्‍चरिताच्या अभ्यास करताना आपल्या लक्षात येते कीसाईभक्त डॉ. पिल्ले (Dr. Pillai) यांचा नारू सद्‌गुरू साईनाथांच्या कृपेने बरा होणे व बापूभक्त डॉ. राजीव कर्णिकांचा रक्त पेशींचा कर्करोग सद्‌गुरू बापूंच्या कृपेना बरा होणे यात साम्य आहे. तसेच श्री साईसच्‍चरितातील लोहारणीच्या पोराला सद्‌गुरू साईनाथांनी आगीच्या भट्टीत हात घालून वाचविणे व बापूभक्त श्रीमती अनिमावीरा शेट्‍टीगार यांचामुलगा३र्‍या मजल्यावरुन पडूनसुध्दा सद्‌गुरु बापूंच्या कृपेनेकाहीही इजा न होता सुखरुपपणे वाचणे यात देखील साम्य आहे. श्रीसाईसच्‍चरितातील साईभक्त श्री. बाळासाहेब मिरीकर (Balasaheb Mirikar) यांना सद्‌गुरु साईनाथांनी पूर्वसांकेतिक सूचना देऊन संर्पदंशापासून वाचविणे व बापूभक्त श्री. अंकुशसिंह चौधरी यांना त्यांच्या थायलंड दौर्‍यादरम्यान पाण्यापासून लांब राहण्याची पूर्वसांकेतिक सूचना देऊन बापूंनी नौका अपघातातून वाचविणे यातसुध्दा साम्य वाटते.
 
या आपल्या फोरममध्ये माझी अपेक्षा अशी की आता आपण साईनाथांच्या भक्तांना आलेले अनुभव आणि बापूभक्तांना आलेले अनुभव यांची सांगड घालत, एक विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु सा”(Ek vishwas asava purta karta harta guru aisa) हे तत्व सुस्पष्ट करुया.
 
ll हरि ॐll

Related Post

11 Comments


 1. faith.. It is the only thing that we hav to keep on Bapu in te phase we all are going through. For us, it should be just Him, or no one. Whatever happens in our life, good or bad, is all bcoz of Him since He knows everything about what we are going through and what we deserve. Just that one faith that the creator and the destroyer is none other than Bapu Himself can take us over the sea of troubles. Where Bapu exists, there is no unhappiness. Our faith should be like the sai bhaktas. Even when sai baba put two balls of bibba in the eyes of the devotee, he did not crib or show any signs of doubt since he had complete trust in baba that He will do no wrong. Whatever baba will do was the best thing for him.. Even when kakasaheb dixit was asked to slaughter the goat, he had no second thoughts, nor did he think that how can I do this. He raised his knife just on 1 word of baba.. Similarly, Bapu's word has to be the last thing in this world for us. Since He has stated that 2013 and onwards is going to be very difficult. But once we have 108% trust on Him that 'to amhala kahihi zala tari tarnarach ahe' and He is going to stand firmly by our side, like our backbone, then our only task is to be His slave. It should be our only wish. This life of mine given by Him which already belongs to Him has been offered at His Charan only. That is our ultimate destiny, where the journey requires total, complete faith and patience. hari om..


 2. अपघात भय जाई टळे अकारण मरण संकटात मिळे मदत …..
  कॅप्टन मकरंदसिंह ओरपे – AADM आणि संस्थेत OC Member म्हणून कार्यरत असलेल्या कार्यकत्याचा अनुभव २००३ साली घडलेला – बापूंची उदी कसे अपघातातुन जीवन वाचविते…. प्राणरक्षण करते… श्रीसाईसच्चरितात साईनाथांच्या उदीचा महिमा आपण वाचतो की नाना चांदोरकरांच्या मुलीच्या प्रसुतीसमयी बाबा स्वत: कशी धाव घेतात , खुद्द तांगेवाला बनुन भक्ताच्या हांकेला कसे सत्वरी धावतात उदी पोहचवितात, अगदी तसेच माझा बापूराया धाव घेतो मकरंदसिंहाच्या अपघातात रिक्षावाल्याच्या रुपात – ठाणे ते विक्रोळी हा प्रवास करवुन – घराचा पत्ता तर माहित नाही – कोण सांगतो तो पत्ता? – सगळेच गूढ – ७२ रुपये ही मागून घेतो रिक्षाचे भाडे- त्याआधी त्यांची बाईक ही नीट पार्क करुन ठेवतो- Collar Bone म्हणजे खांद्याचे हाड व २ बरगद्या मोडलेल्या ,मेंदुला सूज आलेली आणि बेशुद्धावस्थेत पडलेल्या आपल्या लेकराला हाक ही न मारता वाचविते ती फक्त माझी अनंत करुणामयी बापूमाऊलीच… बापूमाऊली, माझी बापूमाऊली हाक नाही मारिली मी तरी आला धावुनी…..
  कारण त्याची ग्वाहीच आहे मुळी मी तुला कधीच टाकणार नाही ….. मकरंदसिंहाकडे होता तो एक विश्वास — एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा — पण जागृतावस्थेत नसतानाही काळजी वाहतो तो माझा बापूरायाच !!!! भक्ताच्या ईत्भुंत कृतीच्या खबरा मज निरंतरा लागती , तुम्ही कुणीही असा, कोठेही असा हे माझ्या साईनाथांचे बोल – तोच परमात्मा त्याच्या अनिरुद्ध रुपातही पाळतोच !!!
  दादा, तुम्ही हा विषय अभ्यासासाठी देउन अनंत उपकारच केले आहेत आम्हां सर्वांवर , बापूंना पुन्हा एकवार जवळून न्याहाळण्याची अमूल्य सुवर्णासंधी !!! मला तप, ध्यान वगैरे काही जमत नाही पण ह्या माध्यमातुन सतत बापूंच्या स्मृतीत, आठवणींत रमता येते , गुण्संकीर्तनासाठी बापूंची नवीन नवीन रुपे अभ्यासता येतात आणि स्मरतात बापूंचे ग्रंथराजातील बोल – मनातल्या मनात केलेले संकीर्तन हा ’रससाधनेचा’ एक सुंदर आविष्कार आणि अविभाज्य घटक आहे.. खरेच माझ्या बापूंना किती किती माझी काळजी आहे – नाठाळ बाळाला काठी ही न हाणंता मार्गावर नेणारा हा एकमेवच माझा देव बापू !!! श्रीराम , श्रीराम ,श्रीराम….


 3. Hari Om. During the last many years and more particularly after we were also able to see the video recordings of experiences in youtube, we could relate these to many of the experiences which devotees of Shirdi Saibaba underwent when Saibaba was living. Each experience in Shri Saisatcharitra was also so unique in nature. So also, each experience of Bapu Bhaktas is unique. We have seen how UDI of Baba could save lives of people, cure diseases. I have seen personally how the UDI protected my car in the 26/7/2005 heavy rains. I have personally seen how by applying UDI to one of my family friend's wife who recovered after nearly one month in coma and she is still living after nearly 2 years of suffering stroke. It is a different matter that they do not have faith in my Sadguru. I have also seen how by applying UDI to my mother in law who was in ICU with septic attack and on the verge of passing away before Makar shakranthi attained the lotus feet of god after shankaranth when the sun begins its northern journey. We know Nanasaheb Chandorkar's story on Udi. We have also seen so many people getting relief from pain and disease by rubbing or consuming udi from Guru kshetram. There are umpteen number of similarities which we can see,experience and share. All these experiences happen and will continue to happen and our belief in our Sadguru should not and need not depend upon these happenings. Let me pray to my Sadguru PP Bapu that my belief becomes stronger and stronger day by day independent of experiences which in any case he will shower on his beloved devotees. Shreeram


 4. Sadgurutatwa he Ekcch ahe.Saisacharitra madhil saibhaktana Sainathanche anubha vegale nahich.108%. Bapu punha sairupat yeun tanchach bhaktana Punha abhay det ahe.He tanche Akaran-karunya dusare Kay.Bapu we all love u……… Hari om Dada.


 5. हरि ओम दादा.
  ह्या वेळेला तुम्ही Forum वर discussion साठी दिलेला विषय खुपच सुंदर आहे. साईनाथांच्या भक्तांना आलेले अनुभव आणि बापूभक्तांना आलेले अनुभव यांची सांगड घालत, “एक विश्वास असावा पुरता, करता हर्ता गुरु ऐसा” हे तत्व सुस्पष्ट करण्यासाठी. दादा , खरेच बापूंनी तुम्हाला दिलेली उपमा अगदी मनोमनी पटते की श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज रुपी पोळ्याच्या रक्षण्कर्त्या मधमाशा आहेत पिपादा व समीरदादा, ज्यांची कुणालाही डंख मारण्याची प्रवृत्ती नाही. डंख मारणे तर केवळ अशक्यप्रायच , पण त्याउलट तुम्ही आम्हां सर्व श्रद्धावानांना अधिकाधिक बापू चरणी दृढ करण्याचे नित्य नूतन अफाट , अचाट असे स्त्रोत सातत्याने अखंड्पणे, अविरत पुरविता, नित्य नवीन अशा क्लृप्त्याच शोधुन काढता आहात , जेणे करुन आमची पावले येथे देवयान पंथावर स्थिर होतील, घट्ट रोवली जातील. Dada, really a grand salute to you !!!!!!!
  बापूचरणी नम्र विनंती की आमच्यासाठी एवढी मेहनत घेणार्‍या दादांनी दाखविलेल्या वाटेवरुन चालून आमचा हाच एक विश्वास दृढ व्हावा कि एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता बापू ऐसा !!!!!
  बापूभक्त डॉ. अजय राघव ह्यांच्या मुलाला (Blood Cancer ) रक्ताचा कर्करोग ह्या जीवघेण्या आजारातून कसे वाचविले हे वाचताना श्रीसाईसच्चरितातील पितळेंची गोष्ट प्रकर्षाने आठवली. पितळे आधी भक्तीला मानत नसावे असे जाणवते, ज्यामुळेच घरात वडीलांच्या कडून आलेली स्वामींच्या भक्तीचा त्यांना विसर पडला होता. मुलाला वाचविण्यासाठी सर्व उपाय थकले तेव्हा ते साईबाबांकडे गेले गुणसंकिर्तन ऐकून, तर येथे माझ्या सदगुरुबापू माउलीने चिडीच्या पायाला दोर लावुन खेचावे तसे डॉ. अजय राघवांना खेचुन आणले, भक्तीचा गंध नाही, देवाला मित्र म्हणुन मारलेली हाक ऐकुन ही, ही माझी बापूमाउली धावुनच गेली. मुलाला तर प्राणदान , जीवनदान दिधलेच , पण पित्यालाही भक्ती मार्गात स्थिर आणि दृढ केले. येथे बापूंनी स्वत:च त्यांचा विश्वास अधिक वृद्धिंगत केला आणि खूण ही पटविली ज्याचे हृदयी श्रीगुरुस्मरण तयासी कैसे भय दारुण काळमृत्यु न बाधे जाण अपमृत्यु काय करी हे गुरुतत्वाचे वर्म ही ठसविले.
  त्यांच्याच घरातील साईंवर दृढ विश्वास असणारे त्यांचे मेहुणे श्री अमित सिंघल ह्यांनाही बापूंनी तसाच अनुभव देउन त्यांचाही विश्वास दृढ केला. १० वर्ष घरात साईभक्ती करीत होते , श्रीसाईसच्चरित वाचीत होते, पण साईंच्या , त्याच सदगुरुतत्त्वाच्या अनिरुद्धरुपाला नाकारत होते. साक्षात परमात्मा प्रकटला आहे ह्या भूवर हे सत्य त्यांचे मन स्विकारीत नव्हते, तेव्हा बापूंनीच लीलया केली. साईंना केलेला नमस्कार आणि डोळे उघडता हात बापू चरणी असा ३ महीने साक्षात्कार घडविला. अपना तकिया छोडना नहीं, अपना बाप तो अपना बाप ह्या गोष्टींची सत्यता पटविली. स्वाईन फ्लुसारख्या प्राणांतिक घटनेतुन त्यांच्या २ महीन्यांच्या मुलीला कसे तारले. टेमिफ़्लु हे औषध देता येत नाही , तो एकच कर्ता हर्ता हे doctor नी सांगितल्यावर फक्त बापूंना एकच प्रेमाची हाक कशी पुरली. येथे आठवली ती दादासाहेब खापर्डेंच्या लहान मुलाची आणि पत्नीची गोष्ट. ग्रंथीज्वराची साथ मह्णजे त्याकाळी जीव घेणे दुखणेच होते. जरी ती साईसहवासाचा आनंद उपभोगीत शिरडीत होती तरी ती घाबरुन उमरावती ह्या वसतिस्थानी जाण्याची परवानगी मागते तेव्हा बाबा स्वत: तिला धीर देतात आणि बोलतात ” पहा हें भोगणें पडे
  तुमचें साकडें मजलागीं”आणि आश्वस्तही करतात सांगुन की ” आभाळ आलें आहे जाण पडेल पाऊस पीक पिकोन आभाळ वितळुन जाईल ” तसेच येथे ही बापू औषधाविना त्या तान्हुल्या छोट्या २ महीन्यांच्या मुलीचे भोगही संपवतात. ह्यासाठी बापूंना सर्व दुखणी स्वत: च्या अंगावरच घ्यावी लागतात असे नाही. पण हे लाभेवीण प्रेम, हे भक्तांनी घातलेले साकडें मानुन त्याचा उद्धार करतोच ना हा प्रेमळा गुरुराया….. खरेच बाबांचे बोल येथे ही माझा अनिरुद्ध बापु ही साक्ष पटवितच होते ना तिच की स्वाईन फ्लुचे आभाळ भरुन आले आहे वितळोन जाईल माझ्या कृपेने आणि तुझे बाळ बरे होईल पूर्णत:.
  भक्त हा बाबांचा असो वा बापूंचा , सदगुरु तत्त्व हे शेवटी एकच असते आणि भक्तांच्या हाकेला धावुन जातेच सत्वरी.
  माझा सदगुरु बापू माझ्या प्रत्येक पावलावर माझ्या बरोबर उभा आहेच, आणि हे बापूंचे बोलच तो एक विश्वास अजुन अजुन दृढ आणि दृढ करतात की YES , काही झाले अख्खे जग जरी विरोधात गेले तरी माझा आणि फक्त माझा बापूच माझ्याबरोबर सदैव होता, आहे आणि असणारच आहे, ह्याच नव्हे तर प्रत्येक जन्मातच!!!!
  श्रीराम…

Leave a Reply