वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका (Don't Waste Your Time, It's Precious)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०१ मे २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका’ याबाबत सांगितले. 

आपण किती वेळा शब्द म्हणतो हे, कंटाळा आला, थोडा टाईम पास करुया. वापरतो कि नाही आपण हा शब्द? तर टाईम पास हा शब्द आपण खूप वेळा वापरतो आणि टाईमपास न शब्द वापरता टाईमपास करत असतो. अर्धा तास आहे ना, जरा आराम करतो. रात्री दहा तास झोपलेला आहे, तरी अर्धा तास आराम करायचा आहे. त्या दिवशी काय केलं, काही नाही. अख्खा दिवस रविवारचा, सुट्टी आहे, माझ्या बापाची जहागिरदारी कोण मला बोलू शकणार? मी काय पाहिजे ते करीन, पाहिजे ते म्हणजे काय, लोळीण, खाईन, पीन, लोळीण, खाईन, पीन, लोळीण, खाईन, पीन, लोळीण बस! बाकी काही नाही. Maximum टि.व्ही लावीन. ते टि.व्ही लावण्याचे कष्ट सुद्धा प्रत्येक वेळी, ए तू लाव रे टि.व्ही, ए तू आण रे रिमोट, बस! तेवढं पण हलायची आम्हाला गरज वाटत नाही. पटतय? इथे लक्षात येईल टाईम किती महत्वाचा होत चालला आहे.

इथे मला सांगायचय राजांनो कि १/८ सेकंदामध्ये बॉडी सतत न्यू होत राहते. एक अष्टांश सेकंदामध्ये आणि सेकंदाच्या एवढ्या लहानशा भागामध्ये काय होतय? १५०००० कि.मि वरती तुम्ही attack करू शकताय आणि ती गोष्ट destroy करु शकता. अख्खं बेटच्या बेटसुद्धा destroy केलं गेलंय हे लक्षात ठेवा. अख्खं बेटच्या बेट. काही देखील उरत नाही. बेट म्हणजे केवळ समुद्राच्या पाण्यावर तरंगत नसतं, ते समुद्र तळापासून वर आलेलं असतं. पण ती बेटं नाहिशी झाल्यानंतर खालपर्यंत काही आढळलं नाही लक्षात ठेवा. म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे कि आम्ही टाईम किती जपून वापरला पाहिजे. तुमच्यावर कोणीही अस्त्र टाकणार नाही आहे, घाबरु नका. आलं लक्षामध्ये.

पण आज शास्त्र किती पुढे चाललं आहे. आणि सायन्स एवढं पुढे चाललं असतांना आम्ही सायन्सच्या बरोबर थोडं तरी चाललं पाहिजे ना! म्हणजे पहिल्यांदा इथे आम्हाला टाईमचं महत्व कळलं पाहिजे. मी असं म्हणत नाही कि झोपू नका, मी असं म्हणत नाही कि पिक्चर बघू नका, मी असं कधीच म्हणणार नाही कि खेळू नका. पिक्चर बघा, खेळा, पिकनिकला जा, आराम करा, सगळं करा. पण ते करतांना टाईमपास करु नका कारण जेव्हा पिक्चर बघता, its a recreational activity. तुमच्या मनाला चांगलं वाटते, शांतता वाटते, मनोरंजन होतं, मेंदूचा भार हलका होतो.

वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका, असे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥