ध्यान (Dhyan – Meditation)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४च्या मराठी प्रवचनात ‘ध्यान कसे करावे’ याबाबत सांगितले.

विचारांमुळे जो एक आवाजाचा कल्लोळ, गोंगाट तयार होतो ना, त्याच्यामध्ये त्या आईचा शब्द विरून जातो. आमच्याच देहामध्ये आहे सगळं, बाहेर कुठेही नाही, ज्यांनी ग्रंथ वाचला आहे, मातृवात्सल्यविंदानम् वाचलं आहे त्यांना माहिती आहे कि सगळी ही परमेश्वरी, हा परमेश्वर, त्यांचा पुत्र परमात्मा सगळं आमच्यामध्येच आहे. बाहेरुन तो आतपर्यंत त्यांचा जो अंश आहे त्याच्याशीच कनेक्ट करतो. मग त्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे?

मी मागेच सांगितलं होतं, आता त्यात जरा improvisation करतो आहे. ह्या ठिकाणी faith हवा आहे. दररोज रात्री किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल तेव्हा एक थोडा वेळ शांत बसा, ध्यान करा. ध्यान करा म्हणजे अमुक आसनात बसा, नाही. आपल्या उपनिषदामध्ये मी दिलेलं आहे ध्यान कसं करायचं. मी दिलेलं आहे म्हणजे मी फक्त लिहून तुमच्यासमोर मांडलं आहे, दिलं आहे त्याच सगळ्या मंडळींनी, बरोबर? परशुराम ते महिषासुरमर्दिनी, ह्या मंडळींनी. माझा त्याच्यामध्ये काहीही भाग नाही.

हे साधं आहे आपल्या आईच्या चेहर्‍याकडे बघायचं, फोटो समोर ठेवायचा, डोळे बंद करायचे, जोपर्यंत ती आई दिसते आहे तोपर्यंत बघत रहायचं, दुसरा विचार आला कि डोळे लगेच उघडायचे परत तिच्या फोटोकडे बघायचं परत डोळे बंद करायचे. शांतपणे आपण कुठ्ल्याही डोक्याला ताप न देता एवढं जरी दररोज नीटपणे केलं, तरी तुमच्या जीवात्म्याला तो शब्द नीट ऐकू येईल त्या सद्गुरुंचा, त्या आईचा कि जेणेकरून तुमच्या जीवात्म्याला ताकद मिळेल आणि ती ताकद तुमच्या शरीरभर पसरेल, तुमच्या मनामध्ये पसरेल, तुमच्या प्राणांमध्ये पसरेल आणि मुख्य म्हणजे तुमच्या प्रारब्धामध्ये पसरेल. मनामध्ये पसरलं की प्रारब्धामध्ये पसरेलेच कारण मन आणि प्रारब्ध ह्या दोन्ही गोष्टी मुळीच वेगळ्या नसतात.

एक दिवसातून पाच मिनिटं तरी कमीत कमी अगदी शांतपणे मी आणि माझा देव. तुम्ही प्रार्थना कराल, उपासना कराल, त्यामध्ये बराच वेळा आपलं लक्ष नसतं. मला माहित आहे होणारच आहे तसं. तुम्ही काही संत महात्मे लागून गेला नाहीत. पण एक पाच मिनिटं त्या फोटो समोर बसून कुठलाही विचार मुद्दामून करायचा नाही. कुठल्याही विचाराला विरोध करायचा नाही. पण फक्त एकच काम करायचं काय? कि त्यांच्या फोटोकडे बघायचं डोळे बंद करायचे, तो फोटो दिसतो आहे तोवर डोळे बंद, परत डोळे उघडले, परत बघितलं, परत बंद केले. काही वेळा असं होईल कि त्याच्यामध्ये पण चुकाल, काही हरकत नाही, so what? आणि त्या प्रार्थनेच्या नंतर सांगायचं की आई मला अधिक धैर्य दे, हे मोठी आई, मला अधिक पैसा दे, हे मोठी आई मला अधिक यश दे, हे मोठी आई मला अधिक सुख दे. हे मोठी आई मला अधिक आरोग्य दे. Yes.. हे नको ते नको मागायचंच नाही. उच्चार करायचा तो कसा करायचा? माझ्याकडे आहेच. तेव्हा मी तुम्हाला एक वाक्य सांगितलय – थोडा है, थोडे की जरुरत है। हे पिक्चर मधलं गाणं आहे, हे काही माझं वाक्य नव्हे, पण हे मला आवडलं. पण आम्ही कसं म्हणतो थोडा है, तसं नाही थोडा है, थोडे की जरुरत है। Yes.

‘ध्यान कसे करावे’, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Related Post

Leave a Reply