अमळनेर येथील श्रीदत्तजयंती उत्सव - प्रथम दिन

सर्व श्रद्धावानांना माहितच आहे की सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या संकल्पानुसार श्री सद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌च्या उभारणीचे काम यावर्षीच्या श्री दत्तजयंती उत्सवापासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच या श्री सद्‌गुरु पुण्यक्षेत्रम्‌च्या उभारणीचा एक भाग म्हणूनच बापूंच्या सांगण्याप्रमाणे या वर्षापासून अंमळनेर येथेही श्रीदत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. हे या दत्तजयंती उत्सवाचे पहिले वर्ष असल्यामुळे या वर्षी हा उत्सव चार दिवस साजरा होणार असून आज या उत्सवाचा पहिला दिवस होता. 

दिनांक २९-११-२०१७ रोजी मुंबईहून पूजनातील श्रीदत्तपंचायतन तसबीरी {(१) श्रीदत्तात्रेय (२) श्रीपादश्रीवल्लभ (३) श्रीनृसिंहसरस्वती (४) श्री अक्कलकोट स्वामी व (५) श्रीसाईनाथ यांच्या तसबीरी} व श्रीदत्तात्रेय उदी कुंभ अमळनेर येथे नेण्यात आले. या श्रीदत्तात्रेय उदी कुंभात सद्‍गुरु बापूंनी करून घेतलेल्या दत्त उपासना / साई गायत्री यज्ञातील तसेच इतर महत्वाच्या उत्सवात झालेल्या तसेच गुरुक्षेत्रम्‌ येथील हवनातील व यज्ञातील उदी ठेवली गेली आहे. आज उत्सवस्थळी सकाळी ९:३० वाजता मुख्य स्टेजवर तसबीरींची स्थापना होऊन त्यांचे नित्य प्राथमिक पूजन झाले. हे पूजन झाल्यावर स्टेजवरील पडदा उघडण्यात आला. यानंतर श्रीदत्तात्रेय उदी कुंभाचे उत्सवस्थळी श्रद्धावानांकडून जल्लोशात स्वागत करण्यात आले. सर्व श्रद्धावानांनी ’दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या गजरात पालखीतून श्रीदत्तात्रेय उदी कुंभ स्टेजवर आणला. महाधर्मवर्मन डॉ. योगिंद्रसिंह यांनी स्टेजवर या उदी कुंभाची स्थापना केली व कुंभाला श्वेतपुष्प व श्वेतपुष्पांचा हार अर्पण केला. स्थापना झाल्यावर महाधर्मवर्मन यांनी सर्व उपस्थित श्रद्धावानांना उदीकुंभाची माहिती दिली.

त्यानंतर पूजकांतर्फे उत्सवातील प्रथम दिवसाचे पूजन करण्यात आले. आजच्या पूजनात श्रीगणपति अर्थवशीर्षाचे २१ वेळा पठण करण्यात आले व नैवेद्य अर्पण करण्यात आला. पठणानंतर महाधर्मवर्मन यांनी उपासना करून आजच्या पूजनाची सांगता केली. पूजनानंतर प्रत्येक श्रद्धावानाला पूजनस्थानी दुर्वा वाहण्याची संधी मिळाली. श्रद्धावानांना उत्सवस्थळी संध्याकाळी एक तास मुंबई येथील अधिवेशनात झालेल्या काही निवडक अभंग व गजराची सीडी दाखवण्यात येईल. आजच्या पूजनाची काही निवडक छायाचित्र सोबत देत आहोत.

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम

 

[gallery columns="2" size="medium" href="file" ids="1144749,1144750,1144751,1144752,1144753,1144754,1144755,1144756,1144757,1144758,1144759,1144760">