भारत सर्वाधिक तरुणांचा देश बनत चाललाय. त्याच प्रमाणात या देशात तरुणांचं सर्वाधिक आवडतं माध्यम असलेल्या सोशल मिडीयाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. देशातल्या नेटिझन्सची संख्या कोटींच्या प्रमाणात वाढत असताना, सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव कुणीही थोपवू शकणार नाही.
तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर अधिकाधिक व्यापक होत चाललेले हे माध्यम, आज जगावर अधिराज्य गाजवीत आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सोशल मिडीयाचा अपरिहार्य परिणाम अगदी स्पष्टपणे जाणवतो.
म्हणूनच वेळ आली आहे, ती हे जबरदस्त क्षमता असलेले माध्यम अधिक प्रगल्भतेने, कल्पकतेने आणि जबाबदारीने हाताळण्याची. त्यासाठीच येतो आहे, ’दैनिक प्रत्यक्ष’चा १ जानेवारी २०१४ चा नववर्ष विशेषांक, ज्याचा विषय आहे….
’सोशल मिडीया – परिपूर्ण व परिपक्व वापर’
Published at Mumbai, Maharashtra – India
Permalink
हरी ओम
खरच सोशल मिडीयामुळे आज जग इतक्या जवळ आले आहे कि ह्याची कल्पना दहा वर्षांपूर्वी कुणी केली नसेल. त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ह्या विषयावरील लेख वाचायला खरेच खूप आवडेल. ह्या विशेषांकाची आतुरतेने वाट पाहतोय….
अम्बज्ञ