जगविख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाइन यांच्या “माणूस ज्याला योगायोग म्हणतो, ती खरं तर भगवंताने नामानिराळे राहून त्या मानवाच्या हितासाठी केलेली योजना असते”, या वाक्यासंदर्भात सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात विवेचन केले. योगायोगाला अस्तित्व नसून ती भगवंताची लीला असते आणि भगवंत स्वत:कडे कुठलेही श्रेय न घेता लाभेवीण प्रेमाने आपल्या लेकारांसाठी त्यांच्या विकासाची योजना कार्यान्वित करत असतो.
आपण या व्हिडियोत ते पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
ह्या वाक्याचा संदर्भ देत स्पष्टीकरण देवून बापूंनी आपल्या सर्वांच्या मनात ठसवले कि जे काही घडत असते ते भगवंताच्या मर्जीनेच घडत असते. योगायोग नावाची गोष्टच नसते. ह्यामुळे आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत येते. अम्बज्ञ