विलक्षण मानवधर्म भाग – २
(उत्तरार्ध) ‘क्षमेचा सागर असणारा भगवंत क्षमाशील आहे, भगवंताचे कार्य मानवाला शिक्षा करणे हे नसून मानवाला प्रारब्धाच्या गुलामीतून सोडवून मानवाचा समग्र विकास करून आपल्या प्रत्येक लेकराला सर्वस्वी आनंदी बनवणे हीच भगवंताची इच्छा आहे. तुमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचतच असते, त्यासाठी कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, भगवंत आणि त्याचा भक्त यांचे नाते थेट आहे, त्यांच्यात कुणाही एजंटची गरज नाही.’ अशी ही शाश्वत संकल्पना डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशींनी श्रद्धावानांच्या मनावर ठसवली आणि सर्वसामान्य श्रद्धावानांचा प्रवास