श्रीमांदारगणेश चे स्वागत ( Welcoming Mandar Ganesh )
श्रीमांदारगणेश चे स्वागत श्रीमांदार-गणेश हे अत्यंत सिध्द व स्वयंभू असे गणेशाचे स्वरूप आहे. ह्यास मांदार-गणेश अथवा श्रीमूलार्क-गणेश अथवा श्रीश्वेतार्क-गणेश असेही म्हटले जाते. अशा श्रीमांदार-गणेशाच्या स्वागतासाठी / स्थापनेसाठी आवश्यक असलेले वेदोक्त विधी सांप्रत श्रीअनिरुध्द-गुरुक्षेत्रम्मध्ये चालू आहेत. साधारणत: बाजारात / इतरत्र ह्या स्वरूपातील अनेक मूर्ति बघावयास मिळतात; मात्र त्या तयार केलेल्या किंवा कोरलेल्या असतात. नैसर्गिक अवस्थेतील सिध्द व स्वयंभू स्वरूपातील श्रीमूलार्क-गणेश ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. रुईच्या झाडाच्या अनेक प्रजाती आहेत. नील