मध्यम मार्ग – २३ डिसेंबर २००७
परमपूज्य बापूंनी लिहिलेल्या धर्मग्रंथाचे नामच मुळी ‘श्रीमद्पुरुषार्थ’ हे आहे. दैववादाची किंवा अंगाला राख फासण्याची भाषा सद्गुरु बापूंनी कधीच केलेली नाही व कुणासही शिक्षण, प्रपंच, व्यवसाय इत्यादिंकडे दुर्लक्ष करण्यास कधीच सांगितलेले नाही. मात्र प्रवृत्तिवादी जीवन अधिकाधिक चांगल्या रितीने जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थांच्या बरोबर भक्ती आणि मर्यादा हे दोन पुरुषार्थ नितांत आवश्यक आहेत, हेच सद्गुरु श्रीअनिरुध्द सदैव सांगत असतात. आजच्या ह्या जागतिकीकरणाच्या युगात खरी ससेहोलपट होत आहे,