न्हाऊ तुझिया प्रेमे (Nahu tuzhiya preme)
सद्गुरु गुणसंकिर्तनाचा महिमा अपार आहे. सद्गुरु अनिरुध्दांवरील श्रध्दावानांच्या प्रेमातुनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. अनेक श्रेष्ठ व ज्येष्ठ श्रध्दावानांनी ह्या भक्तिरचनांमधून त्यांच्या सद्गुरुंचं गुणसंकिर्तन केलं आहे. श्रीकृष्णशास्त्री इनामदार, त्यांच्या पत्नी सुशिलाताई इनामदार, आद्यपिपा, साधनाताई, मीनावहिनी हे सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ श्रध्दावान होते. त्यांच्या ह्या भक्तिरचनांना सूर आणि स्वरांच कोंदण लाभल आणि ह्यातून जन्म झाला ’ऎलतिरी मी पैलतिरी तू’, ’गाजतिया ढोल नी वाजतिया टाळ’, ’पिपासा’, ’वहिनी म्हणे’, ’पिपासा पसरली’, ’तुम बिन कौन