देव आमची काळजी घेतो (God takes care of us)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘देव आमची काळजी घेतो ’ याबाबत सांगितले. आम्ही देवाला मानतो. आमच्याकडे शब्द काय असतो बघा, आम्ही देवाला मानतो. आम्ही गुरु केला आहे. देवाला मानणारे तुम्ही कोण? जर देव खरा असेल, तर तुम्ही माना किं वा न माना, फरक काय पडतो? तुमच्या मानण्यामुळे तो देव नाही आहे. तो देव आहे हे तुम्हाला काय असायला पाहिजे? तुमच्या मानण्याचा प्रश्न नाही आहे.