
परवा म्हणजेच दिनांक ७ एप्रिल २०१५ला ‘रक्तदान शिबिर – २०१५’ (blood donation camp) बाबत पोस्ट येथे टाकली होती. तुम्ही ती पाहिली असेलच. हे रक्तदान आता एक दिवसावर म्हणजेच उद्यावर येऊन ठेपले आहे. ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे रविवारी म्हणजेच दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी आयोजित केलेले हे भव्य रक्तदान शिबिर आपण सर्व श्रद्धावानांना उदंड अशा प्रतिसादाने यशस्वी करायचे आहे. मला खात्री आहे की परमपूज्य अनिरुद्धांचे सर्व श्रद्धावान मित्र या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदानासारखे सर्वश्रेष्ठ दान नक्कीच यशस्वी करतील.
ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll
Permalink
Hari Om Samirdada,
I will be definitely donating the blood. Donating blood is everyone’s duty !!!