बापूंची नित्य न्याहारी (नाश्ता) – आंबील किंवा इडली (Ambil)

English

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सकाळच्या न्याहारीकरिता वेळ मिळत नाही असे अनेकजण सांगताना आपण ऐकतो…..आणि अशावेळी मग जे काही असेल ते, शक्यतो ब्रेडच आपल्या नाश्त्याचा आविभाज्य भाग बनतो. “ब्रेडशिवाय नाश्ता” ही संकल्पना अनेकांना पटत नाही. असं असूनही अनेक घरांमध्ये आजही विविध पदार्थ केले जातात.

Ambil-Recipe
Ambil Recipe

पण बापूंचा नाश्ता मात्र standard नाश्ता असतो. बापू आपल्या नाश्त्यासाठी एकतर आंबील आणि / किंवा इडलीच खातात; आणि इडली सुद्धा तांदूळ व उडदाच्या पीठाचीच ! काही ठिकाणी इडली फक्त तांदळाच्या पीठाचीच करण्याचीच पद्धत असते. पण अशाप्रकारे केलेली इडली बापू शक्यतो टाळतात. “आंबील” मात्र बापू नाश्त्याला नेहमी घेतात. आजच्या तरुण पिढीला एखादवेळेस आंबील हा पदार्थ माहितही नसेल, कारण मी ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो त्यांनी आंबील क्वचितच कधी खालल्याचं मला आढळलं. तांदळापासून बनणारं, बनवायला सोपं आणि कमी खर्चिक असं हे आंबील शरीरासाठी मात्र अत्यंत गुणकारी आहे.
आज बापूंच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सगळेही नाश्त्याला आंबीलच घेतो. छोटे दीड ते दोन बाउल भरून आंबील एका माणसाला पुरेसं होतं. आंबील नाश्त्याला घेतल्यामुळे, आपण त्याबरोबर समजा इतर काही पदार्थ घेणार असू, तर त्याचंही प्रमाण खूपच कमी होतं. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जाण्याचा प्रश्नही उरत नाही. आंबीलने भूकही छान भागते व ते पोटासाठी शामकही आहे.
आज सर्वांच्या माहितीसाठी परमपूज्य नंदाई घरी करतात त्या आंबीलची रेसिपी खाली देत आहे.

आंबील भात 

Ambil Recipe
Ambil Recipe

* साहित्य –

परिमल तांदूळ – १ वाटी
साखर – १ चमचा
दह्याचे ताक – ५ वाटी
पाणी – ७ वाटी
मीठ – चवीनुसार

* कृती –

सर्वप्रथम १ वाटी परिमल तांदूळ एका पातेल्यात घ्यावेत. त्यानंतर ते तांदूळ तीन वेळा पाण्यात धुवावेत. धुवून झाल्यानंतर त्यात ७ वाटी पाणी घ्यावे. जी वाटी आपण तांदूळ मोजण्यासाठी वापरली आहे, तीच वाटी पाणी मोजण्यासाठी वापरावी. त्यामुळे प्रमाणात फरक पडणार नाही. पाणी घेऊन झाल्यानंतर तांदळाचे पातेले कुकरमध्ये ठेवून ३ शिट्या काढाव्यात.

Ambil-Recipe
Ambil-Recipe

भात शिजल्यानंतर भाताचे भांडे कुकरमधून बाहेर काढून ठेवावे. जेव्हा आपण भाताचं भांडं बाहेर काढू तेव्हा त्यात पाणी असणारच आहे. आता हा भात थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढावा. अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे ५ सेकंदांपर्यंत मिक्सर फिरवावा. मिक्सरच्या भांड्यातून परत तो भात त्या पातेल्यात काढून घ्यावा. आता त्यात १ चमचा साखर व चवीनुसार मीठ घालावे. साखर व मीठ घातल्यानंतर हा भात पुन्हा चांगल्या रितीने मिक्स करावा.

Ambil-Recipe
Ambil-Recipe

नंतर अशा प्रकारे मिक्स झालेल्या भातात ५ वाटी ताक घालावे. ताक घालून झाल्यानंतर परत ह्या भाताला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता मिक्स झालेल्या भाताची चव घेऊन बघावी. गरज वाटल्यास मीठ थोडे अधिक घालावे. त्यानंतर हे भाताचे भांडे तसेच रात्रभर ठेवावे. फ्रिजमध्ये ठेवू नये. आंबील तयार होण्यासाठी साधारण १२-१४ तास वेळ लागतो.

Ambil-Recipe
Ambil-Recipe

अशा प्रकारे तयार झालेले आंबील आपण दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ तास झाल्यानंतर खाऊ शकतो.

म्हणजेच संध्याकाळी ८ वाजता केलेले आंबील आपण दुस-या दिवशी सकाळी १० वाजता खाऊ शकतो.

ll  Hari Om  ll    ll  Shriram  ll    ll  Ambadnya  ll

Related Post

5 Comments


 1. हरि ओम,
  मी स्वतः यापूर्वी आंबील कधीच खाल्लेले नाहि. आम्हीही नक्कीच नाश्त्यामध्ये आंबील घेण्यास सुरुवात करू.

  Ambadnya


 2. Hari Om,

  Looks Yummy. I will try this weekend. Is it possible to make Ambil without sugar? For people who are “Sugar Barons” a substitute will help. Most of the sugar substitutes have some side effect, even so called “natural” substitutes.

  Will it be too much if we ask what P.P.Bapu takes for lunch and dinner? We are curious because we want to follow him as much as possible.

  Ambadnya


 3. What a pleasant surprise. !!! . this can’t be a coincidence for sure .. you won’t believe this .. just yesterday my Doctor asked me lose weight by at least 10 Kgs and one of the main question that was harassing me was “what should I have in my breakfast that will be healthy and not add to my calories ?” and here you have Bapu answering my query :-)
  Tons of Ambadnya Bapu !!! Ambadnya Dada for the recipe .. it will surely be a yummy breakfast .. can’t hardly wait :-)


 4. हरि ओम,

  मी स्वतः यापूर्वी आंबील कधीच खाल्लेले नाहि. आंबीलविषयी आधी ऐकले जरी असले तरी ते कसं बनवतात हेही माहित नव्हतं. बापू नाश्त्यासाठी आंबील घेतात हि माहिती आणि विस्तृत पाककृती दिल्याबद्दल मनापासून अंबज्ञ. आम्हीही नक्कीच नाश्त्यामध्ये आंबील घेण्यास सुरुवात करू.


 5. Hari OM.
  This is indeed a good recipe. Love to prepare and eat it. It will give such a nice feeling to have the breakfast with Bappa and with his favorite food. Love you, my Dad.
  ambadnya.
  Priyamwadaveera.

Leave a Reply