इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नंदाईंनी लिहीलेल्या पुस्तकांचे प्रकाशन

Nandai-Aatmabal2
नंदाई आत्मबलच्या वर्गादर्म्यान इंग्रजी शिकवताना

मे २०१० रोजी झालेलं ’रामराज्य २०२५’ ह्या संकल्पनेवरील परमपूज्य बापूंचं प्रवचन श्रद्धावानांनी ऐकलेले आहेच. ह्या प्रवचनात बापूंनी अनेकविध विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे ’चांगल्या प्रकारे इंग्लिश भाषेत बोलायला शिकणे’. त्यावेळी बोलताना बापू म्हणाले होते की “आज इंग्लिश ही जगाच्या व्यवहाराची भाषा बनली आहे. मातृभाषेचा अभिमान जरूर बाळगावा. पण आजच्या घडीला स्वत:च्या लौकिक प्रगतीसाठी इंग्लिश सुधारणं आवश्यक आहे. जर आपल्याला जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून रहायचं असेल, तर प्रवाहीपणे इंग्लिश बोलता यायलाच पाहिजे. त्यासाठी आपण ‘अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज अ‍ॅण्ड लिंग्विस्टिक्स’ ही संस्था स्थापन करत आहोत.” बापू पुढे म्हणाले होते की “अनेक माणसे इंग्लिश बोलायचं म्हटलं की विचार पहिल्यांदा आपल्या मातृभाषेत करतात आणि मग इंग्लिशमध्ये बोलतात. हे चूक आहे. ह्यामुळे विचार करण्यामध्ये आणि व्यक्त करण्यामध्ये एक दरी तयार होते. ह्या दरीमुळे भाषा ओघवती रहात नाही. भाषा ओघवती असणं महत्त्वाचे आहे. भाषेची जी फ्लुएन्सी आहे, ती महत्त्वाची आहे.”

Nandai-Aatmabal-English2-300x190तसेच ह्या इन्स्टिट्यूटच्या प्रमुख व सर्वेसर्वा ह्या स्वत: ‘सौ. स्वप्नगंधावीरा अनिरुद्धसिंह जोशी’ (म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नंदाई) असणार आहेत असेही बापूंनी त्यावेळी जाहीर केले होते. आपल्या सर्वांना माहितच आहे की नंदाई आज गेली अनेक वर्षं ‘स्त्रियांचे आत्मबलविकास वर्ग’ चालवित आहेत, ज्यामध्ये इंग्लिश शिकणे हे आत्मबलच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचे अंग असते. आत्मबलाच्या वर्गामध्ये प्रवेश केलेल्या काही स्त्रियांना सुरुवातीला इंग्रजी भाषेचा गंधही नसतो. परंतु ह्याच स्त्रियांना नंदाई अवघ्या ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये इंग्रजी भाषा बोलायला व लिहायला शिकवतात, जेणेकरून आत्मबलचा क्लास केलेल्या स्त्रिया रोजच्या व्यवहारापुरती इंग्रजी भाषा वापरायला शिकतात. त्याचप्रमाणे आत्मबलच्या कोर्स अखेरीस असणार्‍या स्नेहसंमेलनामध्ये ह्यातीलच काही स्त्रिया इंग्रजी नाटिकेमध्ये आत्मविश्वासाने भाग घेतात.

ह्याच अनुषंगाने, इंग्लिश भाषा शिकण्यास उपयुक्त असणारी, स्वत: नंदाईंनी लिहीलेली पुस्तके, संचाच्या (Set) स्वरूपात लवकरच प्रकाशित होत आहेत. ह्या पुस्तकांच्या आधारे सर्व इच्छुक श्रद्धावानांसाठी इंग्लिश शिकण्यास सहज व सुलभ मार्ग खुला होईल. हे पुस्तक बघणं, वाचणं व वापरणं हा एक आगळावेगळा आनंददायी अनुभव असेल. तसेच बापूंना अपेक्षित असलेल्या रामराज्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असेल हे निश्चित.

[btn link=”https://www.aniruddhafriend-samirsinh.com/2013/08/22/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%8F/” color=”orange”] हिंदी [/btn] [btn link=”https://www.aniruddhafriend-samirsinh.com/2013/08/22/publication-of-english-language-learning-guides-authored-by-nandai/” color=”orange”] English [/btn] [btn link=”http://aniruddhafriend-kannada.blogspot.in/2013/08/blog-post_26.html” color=”orange”]ಕನ್ನಡ[/btn] [btn link=”http://aniruddhafriend-bangla.blogspot.in/2013_08_01_archive.html” color=”orange”]বাংলা[/btn]

Related Post

8 Comments


 1. पूज्य दादा हरि ओम ,
  मी अम्बज्ञ आहे !
  खूप सुंदर बातमी दिलीत तुम्ही . परमपूज्य नंदाईने ‘इंग्रजी ‘ भाषा शिकण्यासाठी लिहिलेली ही पुस्तके …म्हणजे ‘या भाषेच्या बागुलबुवाच्या जोखडाखाली दाबून गेलेल्या तिच्या बाळांनी टाकलेला सुटकेचा निश्वास’ !
  परमपूज्य नंदाईच्या मार्गदर्शनाखाली चालवलेले ‘आत्मबलाचे ‘ वर्ग, हे फक्त त्या स्त्री चे व्यक्तिमत्व घडवत नाहीत तर त्या स्त्रीशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला ,गोष्टीला सामर्थ्यवान करतात..जिवनात समाधान आणि आनंद निर्माण करतात. इंग्रजीचा गंधही नसलेल्या प्रत्येक सखीला व्यवहारा पुरते तरी इंग्रजी यायलाच हवे…व ज्यांना येते त्यांची अधिक प्रगती व्हावी यासाठी आईचे प्रयास असतात. .याच अनुषंगाने परमपूज्य नंदाईचा हा उपक्रम समाजात क्रांती घडवणारच..१०८% …
  आज मी स्वतः ऑफिसमध्ये अशी उदाहरणे पहिली आहेत,कि उत्तम बुद्धिमत्ता असलेया व्यक्ती आहेत परंतु इंग्रजी नीट बोलता येत नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होते ..प्रगतीट अडथळे येतात . हि पुस्तके अशा व्यक्तींना प्रगती पथावर नेण्यासाठी हात देतील… …..कारण हा हात माझ्या लाडक्या नंदाईचा आहे .
  अशी माझी आई जी एकाच वेळी तिन्ही स्तरांवर कार्य करते…
  बाळाचे बोट धरून अक्षरे गिरवणारी ….बाळांना सोप्या भाषेत समजावणारी ….त्यांना समजल्यावर त्यांच्यापेक्षा स्वतः अधिक आनंदी होणारी अशी एकमेव ….माझी नंदाई ….
  आपले प्रत्येक बाळ असे सामर्थ्यवान होण्यासाठी अविरत परीश्राम करणाऱ्या या माझ्या आईस कोटी कोटी प्रणाम !
  LOVE YOU AAI ….

  मी अम्बज्ञ आहे .
  AMHI AMBADHYA AHOT …


 2. हरि ॐ दादा
  आई ती आई बहु मायाळू…
  ’इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नंदाईंनी लिहीलेल्या पुस्तकांचे प्रकाशन’ वाचुन खुपच आनंद झाला. परमपूज्य नंदाई आत्मबल वर्गामध्ये इंग्लिशच महत्व सांगते. आज आपल्याला इंग्रजी येणं किती महत्वाचं आहे ते सांगते आणि शिकवतेही. एक शब्द घेऊन त्यापासुन छोटी- छोटी वाक्य बनवुन रोज सराव करणे, तसेच भाज्या, फळे, फुले, भांडी यांना इंग्रजीत काय म्हणतात अशा अनेक गोष्टी शिकवते.
  आणि आता तर नंदाईने लिहिलेल्या पुस्तकांचा संच येणार खरचं दादा आम्ही सगळेजण खुप खुप अंबज्ञ (भाग्यवान) आहोत, आम्हाला साक्षात परमपूज्य नंदाईचे मार्गदर्शन मिळणार आहे. ही पोस्ट वाचून माझे आत्मबलचे अविस्मरणीय दिवस परत आठवले.
  खरचं ‘हे पुस्तक बघणं, वाचणं व वापरणं हा एक आगळावेगळा आनंददायी अनुभव असेल’
  खुप खुप अंबज्ञ दादा…


 3. हरि ॐ पूज्य दादा,
  परमपूज्य बापू, दादा ,आईचा मी खूप ऋणी आहे ते आमच्यासाठी एवढ करून ठेवल आहे कि जेवनाच ताट वाढून ठेवलं आहे फक्त आम्हाला जेवायचं आहे . मी अम्बज्ञ आहे .
  दादा तुम्हाला आताच बुधवारी घडलेली माझ्या बद्दलची बातमी सांगतो मी IT क्षेत्रात काम करतो मी ह्या फीड मध्ये गली ७-८ वर्ष काम करतोय आणि कॉर्पोरते क्षेत्रांत माझ जरा हि इंग्लिश चांगल नाही नाही मला बरोबर लिहतात येत वाचता येत खूप प्रोब्लेम मी FACE करतोय आणि आजून हि करतोय मला ऑफिस मध्ये बुधवारी होंग कोंग मध्ये IT Engineer शी Coordinate करण्यासाठी सांगितलं होत client बरोबर तेव्हा मी खूप घाबरलो माझे सर

  Vice president आहे आणि त्यांनी सांगितल्यावर मला कारव लागल मला माहित होत कि ते मला येणार नाही तरी पण मी हिम्मत करून आणि बापू ना सांगितलं तुम्ही काय ते करून घ्या आणि call आला होंग कोंग मधून मी घाबारलो

  बापू च नाव घेतल आणि विचारल्या लेल्या प्रश्नाची उत्तर दिली तुटकी ती त्यना समझत होईत कि नाही ते बापूलाच माहित. ते सगळ झालाय्वर सर नी मला काय काय झाल बोलन
  त्याची मैल करायला सांगितली ते पण मी घबरोलो आता काय करायचं आणि सर ना माहित होत माझ इंग्लिश काय आहे मी आपल्याच श्र्धान्वान विचारू न मैल ड्राफ्ट केली.

  आणि सर ना पेस्ट केली आणि त्यांनी मला परत काही बद्दल करून पाठवली आणि बोले पाठव

  मी खूप निराश झालो मला साधी सोपी मैल पण कारायला येत नाही कधी मी शिकणार कधी मी इंग्लिश बोलणार कधी शिकणार सगळ डोक फिरलं होत मला बलं च्या क्लास पण जायचं होत मी ओफ्फिवरून निघालो पण डोक्यात हा विचार सतत चालू होता कधी मी स्वताला UDATE करणार आजची दुनिया चलिय कुठे आणि मी कुठे आहे खूप खचलो होतो पण मला माहित होत माझा बापू सगळ नीट करणार मी गुरुशेत्रम ला जात होतो डोक्यात पट कान विचार आला बापू बोले होते इंग्लिशचा क्लास चालू करणार आहे. मी गुरुशेत्राम मध्ये गेला तसाच बापूच्या चरणी डोक ठेवून बोलो बापू लवक्कर इंग्लिश चा क्लास चालू करा मी खूप पाठी आहे मला स्वताची लाज वाटतेय

  तुमच्या क्रुपेन सर आणि मित्र चांगले मदत करणारे भेटले आहेत त्यामुळे आजची मैल ड्राफ्ट करू शकलो. पण मला स्वताला इंग्लिश बोलायचं आहे वाचायचा आहे लवकर क्लास चालू करा. तो दिवस माझा तसाच गेला विचार करण्यात मी उद्या पासून इंग्लिश पेपर वाचयला सुरवात करयची पण कसल काय नेहमीशी सवय काय केल नाही आणि त्यादिविश माझा गुरवारी बर्थडे होतो २२/०८ ला आणि wishes खुपे येत होत्या आणि फ़्चेबॊक ओप्ने

  केल आणि काय सामोरच एक पोस्ट होतो तो
  इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नंदाईंनी लिहीलेल्या पुस्तकांचे प्रकाशन होणारा आहे

  माझा आनंद गगनात मावेना खूप खुश झालो कालच बापूला न बोललो आणि मला आज बर्थडे गिफ्ट दिल.

  परमपूज्य बापू, दादा ,आईचा मी खूप ऋणी आहे . मी अम्बज्ञ आहे.

  माझा बापू आपल्यासाठी हळू हळू सगळ काही नीट करत आहे


 4. हरी ॐ दादा,

  आज सकाळीच मोबाईल उघडला आणि माझ्या ईमेल मध्ये ’इंग्रजी भाषा शिकण्यासाठी नंदाईंनी लिहीलेल्या पुस्तकांचे प्रकाशन’ असा एक मेल आला होता. पाहाताक्षणीच अतिशय आनंद झाला! मी मराठी शाळेत शिकल्यामुळे मनात लहानपणापासूनच इंग्रजी भाषेची थोडी भितीच बसली होती. आपल्याला अस्खलित इंग्रजी बोलता येईल का असं सतत वाटायचं. तेव्हापासून एक चांगलं इंग्रजी बोलण्यासाठी उपयुक्त ठरेल असं पुस्तक शोधत होतो. हल्ली तर इंग्रजी ही जागतीक व्यवहाराची भाषा झाली आहे. त्यामुळे अस्खलित इंग्रजी बोलणे ही काळाची गरज निर्माण आहे. रामराज्याच्या प्रवचनात प. पू. बापूंनी इंग्रजी भाषेचे महत्त्व सांगितलं होतं. तेव्हाच ‘अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज अ‍ॅण्ड लिंग्विस्टिक्स’ बद्दल कळले आणि खूप मस्त वाटले. स्वत: प. पू. नंदाईने लिहीलेल्या ह्या पुस्तकांचा संच मला वाटतं प्रत्येक जण खरेदी घेऊन त्याची स्वत:ची प्रगती करून अस्खलित इंग्रजी बोलू लागेल! आज दादांची ही पोस्ट पाहून आता मला खात्री झाली आहे की मी एक दिवस नक्की चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकेन. अंबज्ञ!


 5. हरी ॐ दादा, हि खूपच चांगली आणि आनंदाची बातमी आहे. आम्ही सारेजण ह्या पुस्तकांची आतुरतेने वाट पाहत आहोत. तुम्ही लेखात सांगितल्या प्रमाणे हे पुस्तक बघणं, वाचणं व वापरणं रामराज्याच्या प्रवासातील हा एक मह त्त्वाचा टप्पा असेलच परंतु त्याच बरोबर बापूंच्या हजारो श्रद्धावान मित्रांच्या आयुष्यातील प्रगतीचा सुद्धा महत्वाचा टप्पा असेल.

  हरी ॐ आई, आम्ही अम्बज्ञ आहोत.


 6. हरि ॐ पूज्य दादा,
  आम्हा सर्व स्त्रियांसाठी ‘परम पूज्य नंदाई’ आणि तिने घेतलेले ‘आत्मबल क्लास’ हा सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे…. आमच्यासारख्या अनेक स्त्रियांना समाजात ताठ मानेने जगायला तिने शिकविले…. अनेक गोष्टींचे नॉलेज ती आम्हाला आत्मबलच्या क्लास तर्फे देत असते….. अगदी आमचा सर्वांगिण विकासच ती घडवून आणत असते…. अगदी आम्हाला कळलेही नाही की आमचा नंदाईने कधी कायापालट केला…. माझ्या जीवनातील आत्मबल तर एक टर्निंग पॉइंट्च होता…
  आत्मबलमध्ये आईची इंग्लिश शिकवण्याची कला माहीत आहेच….. त्यामुळे तिने काढलेले हे पुस्त्क किती महत्वाचे आहे ते आजच कल्पना करू शकतो…. आज जेव्हा तुम्ही या पोस्टद्वारे सांगितले की आईने स्वत: लिहीलेल्या पुस्तकांचा सेट येणार आहे….. हे ऐकून मला काय आनंद झाला म्हणून सांगू…… आमच्यासाठी खूप मोठी मेजवानीच असणार आहे ही….. आम्ही या पुस्तकांचा सेट येण्याची अत्यंत आतुरतेने वाट बघणार तर आहोतच….. शिवाय त्या सर्व पुस्तकांचा उपयोग करून आमचे इंग्लिश सुधारण्यासाठी नक्कीच उपयोग करून घेऊ….
  तुम्ही म्हटल्याप्रमाणे ‘हे पुस्तक बघणं, वाचणं व वापरणं हा एक आगळावेगळा आनंददायी अनुभव असेल’ हा आनंददायी अनुभव आम्हाला लवकरात लवकर मिळावा अशी विन्र विनंती….
  खूप खूप अंबज्ञ


 7. hari om
  i want to learn English so how i can get the admissions i am facing more problems in making English spelling
  so how i can improve my English also English spelling
  sarovar
  hari om

Leave a Reply