अंबज्ञ इष्टिका पूजनातील चुनरी अर्पण करण्यासंबंधी सूचना

Ashwin-Navaratri

हरि ॐ,

अनेक श्रद्धावान आपल्या घरी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितल्याप्रमाणे अंबज्ञ इष्टिका पूजन करतात. यामध्ये श्रद्धावान नित्य पूजनामध्ये अंबज्ञ इष्टिकेला म्हणजेच मोठ्या आईला चुनरी अर्पण करतात. अंबज्ञ इष्टिका पुनर्मिलापच्या दिवशी या चुनरीसुद्धा पुनर्मिलाप करण्यात येतात.

काही उपासना केंद्रांकडून, ह्या पूजनामध्ये दररोज अंबज्ञ इष्टिकेस अर्पण होणार्‍या चुनर्‍यांचे, उत्सव संपन्न झाल्यावर एकत्र विसर्जन करणे प्रशासनाच्या नियमांनुसार अडचणीचे ठरत आहे त्यामुळे चुनरीऐवजी मोठ्या आईला ब्लाऊज पीस अर्पण करण्याविषयी विचारणा केली होती जेणेकरुन हे ब्लाऊज पीस नंतर व्यक्तिगत उपयोगाकरिता किंवा गोधडी शिवण्यासाठी वापरता येतील. या त्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार अंबज्ञ इष्टिका पूजनामध्ये पुढील बदल ह्यावर्षीपासून करण्यात येतील :

१. पहिल्या दिवशीच्या पूजनामध्ये मोठ्या आईला चुनरीच अर्पण करण्यात यावी.

२. दुसर्‍या दिवशीपासून, नित्य पूजनामध्ये श्रद्धावान चुनरी किंवा ब्लाऊज पीस अर्पण करु शकतात. अर्पण केल्यानंतर हे ब्लाऊज पीस अंबज्ञ इष्टिकेवर न ठेवता अंबज्ञ इष्टिकेच्या एका बाजूला ठेवावेत. म्हणजे पहिल्या दिवशी अर्पण करण्यात आलेली चुनरी अंबज्ञ इष्टिकेवर पूजनाचे सर्व दिवस राहील व अर्पण केलेले ब्लाऊज पीस अर्पण करुन झाल्यावर बाजूला काढून ठेवता येतील.

३. हे अर्पण केलेले ब्लाऊज पीस श्रद्धावान मायेची ऊब या योजनेअंतर्गत गोधडी शिवण्यासाठी वापरु शकतात किंवा स्वत:साठीपण वापरु शकतात.

४. अर्पण केलेली चुनरी नेहमीप्रमाणे अंबज्ञ इष्टिकेबरोबर पुनर्मिलाप करण्यात यावी.

वर दिलेल्या पूजनविधीमध्ये दिलेले बदल हे श्रद्धावानांसाठी ऐच्छिक आहेत. श्रद्धावान अंबज्ञ इष्टिकेस दररोज चुनरी अर्पण करु शकतात  व तसे केल्यास सर्व चुनरींचा पुनर्मिलाप करावा.

सुनिलसिंह मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी