हरि ॐ,
अनिरुद्ध प्रेमसागरा…मुंबई नंतर बडोदा आणि काल नाशिक…राम लक्ष्मण सीतेच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत…बापू प्रेमसागराच्या अनिरुद्ध भावभक्ती वर्षावात सर्वच उपस्थित प्रत्येक क्षणाला अक्षरशः न्हाऊन निघाले. प्रत्येक अभंग पराकोटीच्या उच्चतम भावाने सादर झाला.सर्वच ओथंबलेले स्वर व सूर मन, अंतकरण, चित्ताच्या खोलवर गाभाऱ्यातून निघत होते,जे असंख्य भावनांच्या गहिवरांना मोकळी वाट करून देत होते. अत्यंत उत्कृष्ट नियोजन, गायक, वादक यांचे तेवढेच उत्कृष्ट सादरीकरण, फाल्गुनीवारांचे झोकून दिलेले योगदान, अनुभवसंकिर्तन, अभंगाच्या पार्श्वभूमी वरचे समयोचित निवेदन…सारेच काळजाला भिडणारे होते…एकूणच अविस्मरणीय प्रेमयात्रेचे रसपान करण्याची संधी बापूकृपेने लाभली…नाशिक टिम..अंबज्ञ नाथसंविध्
विजयसिंह कुडे, अमळनेर