अनिरुद्ध प्रेमसागरा - २५ फेब्रुवारी २०१८ - नाशिक

हरि ॐ,

२६ मे २०१३ रोजी ’न्हाऊ तुझीया प्रेमे’ हा भव्य सत्संगाचा कार्यक्रम मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाला होता. आजही श्रद्धावानांच्या मनात या कार्यक्रमाच्या गोड आणि सुमधुर आठवणी रुंजी घालत आहेत. या कार्यक्रमाच्या वेळेस सद्‌गुरु श्री अनिरुद्ध म्हणाले होते, "मित्रांनो, चार रसयात्रा झाल्या. शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा. त्यानंतर भावयात्रा झाल्या. परंतू सगळ्याच्या बरोबर कायम चालू असते, आणि कायम चालू रहावी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात, ती ’आनंदयात्रा’.

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोकं ॥

ही माझी शपथ आहे माझ्या आईच्या पायावर हात ठेवून मी घेतलेली. माझं प्रत्येक बाळ, त्याचं जीवन सफळ झालं पाहिजे, त्याला कृतार्थच वाटलं पाहिजे आणि सर्व बाजूने तो संपन्नच असला पाहिजे. मग ती कन्या असो वा पुत्र. याच इच्छेने, याच प्रेरणेने मी उभा आहे, आणि हीच प्रेरणा तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आद्यपिपा, मीनावैनी, साधनाताई, चौबळ आजोबा. या सगळ्यांच्या आठवणी खुप मधुर आहेत, अत्यंत सुंदर आहेत. आणि या सगळ्यांच्या बरोबरीने आपल्याला हा कार्यक्रम, हा सोहळा, ही प्रेमयात्रा अनुभवायची आहे. तुमच्या बरोबर मीही सामील आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मागे आणि पुढे मी बसलेला आहे."

ह्या आनंदयात्रेचा भाग म्हणजेच वडोदरा, गुजरात येथे १ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेला अनुभव आणि सत्संगरूपी गुजराती कार्यक्रम ’अनिरुद्ध प्रेमनो सागर’. याही कार्यक्रमाला श्रद्धावानांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.

या अनिरुद्ध प्रेमसागराला भेटण्यासाठी निघालेली ही आमची आनंदयात्रा त्याच्यासारखीच अथांग आणि कधीही न संपणारी असावी. श्रद्धावानांना या अनिरुद्ध प्रेमसागराला भेटण्याची जेवढी ओढ आहे त्याहूनही अधिक या अनिरुद्धांना त्यांच्या श्रद्धावान मित्रांना भेटण्याची आर्तता आहे. आणि ह्या आनंदयात्रेचा पुढील टप्पा असेल, २५ फेब्रुवारी २०१८ रोजी नाशिक येथे होणारा अनुभव आणि भक्तीरचनांनी नटलेला सत्संगाचा कार्यक्रम ’अनिरुद्ध प्रेमसागरा’.

मग चला तर, आपण सर्वजण या आनंदयात्रेत सामील होऊन या अनुभवसंकिर्तनाचा आनंद लुटुया. भेटूया मग नाशिकला.........

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥