गुरुक्षेत्रम्‌मध्ये आपल्या लाडक्या ‘डॅड’ चे दर्शन

 
आज गुरुवारी दर्शनाच्या ओढीने श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे आलेल्या श्रध्दावानांना बापूंनी अवचितपणे येऊन आनंदाचा धक्का दिला. बर्‍याच दिवसांनी बापूंना गुरुक्षेत्रम्‌मध्ये पाहून एकच जल्लोष झाला. 
 
जोरदार पावसामुळे दर गुरुवारी होणारी उपासना रद्द करण्यात आली असल्याने आज आपल्या लाडक्या डॅडचे दर्शन आपल्याला मिळणार नाही, असा विचार बाहेरगावाहून आलेल्या श्रध्दावानांच्या मनात आला असावा, आणि या मनकवड्या बापूंनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि अचानक समोर आलेल्या बापूंना बघून आनंदाचे जणू उधाण आले.
 
’रामा रामा आत्मारामा…’ या गजराने श्रद्धावानांनी बापूंना काही क्षण बांधून ठेवले आणि बापूंनी देखील अत्यंत प्रेमभराने प्रत्येक श्रध्दावानाला प्रतिसाद दिला.

 
हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ 
नाथसंविध्‌

Related Post

1 Comment


 1. Hari Om.
  I Love you my Dad.
  Missed taking your Darshan by an hour or so.
  I was on the way ….
  Love you so very much…..
  Ambadnya Bapuraya.

Leave a Reply