….आणि आत्मबलच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…(And Aatmabal memories were revived)

….आणि आत्मबलच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…



नंदाचा उत्सव आणि उत्सवाचा आनंद हे ब्रीदवाक्य घेऊन परम पूज्य नंदाईने (माझ्या लाडक्या ताईने) ५ व ६ नोव्हेंबर २०११ रोजी आत्मबल महोत्सव साकारला. अगदी मंत्रमुग्ध करणारा हा असा हा महोत्सव होता. आपल्या तेरा बॅचच्या तेराशे सख्यांना सोबत घेऊन विलोभनीय, अविश्वसनीय आणि “महा” असा महोत्सव साकारला. यासाठी नंदाईसह तिच्या सर्व लेकींनी अहोरात्र मेहनत घेतली. या काळात ताईची (नंदाई) झोप जणू नाहीशी झालेली होती. दत्तगुरु आणि मोठी आई यांच्या आशीर्वादाने आणि परम पूज्य बापूंच्या (अनिरुद्धसिंह) पाठींब्याने ताईने ही किमया घडवून आणली. चांगल्या पवित्र हेतूने जेव्हा हजारो स्त्रिया एकत्र येतात तेव्हा काय घडू शकते याची झलक आम्हा सगळ्यांना या महोत्सवामुळे पाहण्यास मिळाली.

Aniruddha bapu, bapu, aniruddha, happy home, Nandai, memories, transformation, Aatmabal, आत्मबल, women, empowerment, power, upliftment, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu,
कालच या महोत्सवाची डीव्हीडी लॉच झाली. १९ ऑगस्टला संध्याकाळी ताईच्या हातून या डीव्हीडीचे अनावरण झाले. ताईने बळ दिलेल्या राजहंसामधून ही डीव्हीडी बाहेर आली. ह्या डीव्हीडीचे उदघाटन करुन सर्व डीव्हीडींच्या बॉक्सेसमध्ये ताईने उदी टाकली. मग ह्या डीव्हीडी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आल्या. आत्मबलच्या सर्व सख्यांनी डीव्हीडी घेण्यासाठी एकच झुंबड घातली. डीव्हीडी घेताना प्रत्येकीच्या चेहर्‍यावर समाधान होते. खरच हा नंदाई-लेकींचा महोत्सव बघण्यासारखा होता.

रविवारच्या ह्या कार्यक्रमात नंदाईने अमूल्य मार्गदर्शन केले. आपल्या लेकींना गुणसंकीर्तनाचे महत्व पटवून दिले. यासाठी श्री. गौरांगसिंह वागळे यांचे गुणसंकिर्तन कसे करावे? याचे दीड तासाचे लेक्चर ठेवले. ताईने तिच्या लेकींना २६ ऑगस्टला गोविद्यापिठम्‌, कर्जत होणार्‍या मेगा वृक्षारोपण सेवेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. ताईने २० ते २५ मिनीटे लेकींशी हितगुज केले. त्यानंतर डीव्हीडीमधील अर्ध्या तासाचा भाग सगळ्यांना दाखवण्यात आला. खरच सार्‍यांच्याच आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. डोळे भरुन आले होते.. आणि अशातच नंदाईने एक सुंदर गोष्ट सांगितली.

Aniruddha bapu, bapu, aniruddha, happy home, Nandai, memories, transformation, Aatmabal, आत्मबल, women, empowerment, power, upliftment, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu,

आत्मबल महोत्सवाचे फेसबुक पेज ऑक्टोबरमध्ये लॉच केले होते आणि पेजला इतका चांगला रिसपॉन्स आला की खुद्द फेसबुक कंपनीने याची दखल घेतली. त्या संदर्भात स्वीडनवरुन आलेले पत्र ताईने सर्वांना दाखविले. आणि तेव्हा ताई म्हणाली…. Now Aatmabal has become global.खरच सांगतो यावेळी सार्‍यांचा ऊर अभिमानाने भरुन आला होता. श्रीराम… ताईने फेसबुक म्हणजेच सोशल मिडीयाचे महत्व सांगितले. आज भारतामधील मिडीया, महत्वाचे न्यूजपेपर्स, न्यूज चॅनल्स‌ यांचे स्वतःचे फेसबुक पेज आहे. यावरुनच फेसबुक माहित असणे, वापरता येणे ही काळाची गरज आहे. ताईने तिच्या लेकींना याची जाणीव करुन दिली व आत्मबल महोत्सव पेजवर ह्या कार्यक्रमाचे अपडेट पाहण्यास मिळतील असे सांगितले.


आत्मबलच्या या सार्‍या प्रवासात बापूंची साथ कायम ताईबरोबर होती आणि आहेच. बापू (अनिरुद्धसिंह) देखील स्वतः सुरुवातीला आत्मबलमध्ये शिकवायचे. आज आत्मबलची नवी म्हणजेच १४ वी बॅच सुरु झाली आहे. नंदाईच्या नव्या तपाला सुरुवात झाली आहे… नंदाई आणि तिच्या लेकींच्या उत्सवाची नव्याने सुरुवात होत आहे…

Aniruddha bapu, bapu, aniruddha, happy home, Nandai, memories, transformation, Aatmabal, आत्मबल, women, empowerment, power, upliftment, God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu,
ll हरि ॐ ll

Related Post

16 Comments


 1. हरी ओम ! दादा !आत्मबल महोत्सवाची सी डी आली हे वाचून कधी एकदा ती पाहीन असे झाले आहे .आत्मबल महोत्सव म्हणजे आमच्या नन्दाईने आपल्या लेकींना दिलेली एक आनंदाने भरलेली सन्दुक आहे .जेन्ह्वा जेन्हवा हि सन्दुक उघडली जाते तेन्ह्वा तेन्ह्वा त्यामधून फक्त आनंद आणि आनंदच बाहेर येतो .आणि आमच्या जीवनाला व्यापून टाकतो .मनाची मरगळ एका क्षणात कुठल्या कुठे जाते .माझ्या जन्म जन्मांतरीच्या आईने दिलेला हा ठेवा खरेच कधीच रिता न होणारा आहे .आई तुझी खूप खूप आठवण आली ग. खरच !ते सारे” मंतरलेले ” दिवस आठवले.तुझे शब्द परत ऐकले आणि तूच केलेल्या या कुरूप बदकाचा नव्याने झालेला राजहंस तुझ्याकडे मनानी झेपावला “.एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मले मी “.आई ! आता सी डी मुळे सर्वत्रच हा आनंद पसरेल .आई!आमच्यासाठी तू घेतलेले अथक परिश्रम आम्ही कधीच विसरणार नाही .


 2. हरी ओम दादा,

  जिथे दोन बायका जास्ती वेळ एकत्र राहू शकत नाहीत तिथे १४०० बायकांना एकत्र आणून कार्यक्रम करून दाखवण्याची जादू ५ आणि ६ नोवेम्बारला आपल्या हरिगुरुग्राम्ला घडली. जगातल्या मोठ्यात मोठ्या जादूगाराला

  लाजवेल अशी हि जादू 'नंदाई' नामक जादुगार्नीने केली. ह्या कार्यक्रमात भाग घेतलेल्यांना वय आड आले नाही. वय वर्ष २२ ते ७० सगळ्याच त्यात होत्या. आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ह्यातली कुणीही कधीही मंचाची

  पायरी चढलेली नव्हती.

  १४०० बायकांना एकत्र आणून केलेल्या ह्या आफाट आणि आचाट कार्यक्रमाला आणि ह्या कार्यक्रमाच्या एकमेव डिरेक्टर, कोरिओग्रफर आणि साबकुच असलेल्या नन्दाइला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक

  ऑफ रेकॉर्ड्स झुकून कुर्निसात करतील असा हा कार्यक्रम.

  अश्या ह्या कार्यक्रमाच्या दिविडीज बघून खरोखरच आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

  'हरी ओम'


 3. Hari om Dada,
  Yesterdays function was a Grand one and it was rather a Big Surprise in this way. हा सोहळा म्हणजे आईने आमच भरभरून कौतुक केल आहे. नंदाईबरोबर बसून काल CD झलक बघण्यात एक वेगळाच आनंद होता.
  AAI gave us immense happiness through opportunity of Aatmabal Mahotsav. By all her efforts Aatmabal has become Global which is such a unique happening. Moreover She has set an example through this unique Mahotsav to what is required to take up a task to achievement and success. Throughout her being at the fuction Aai stressed through her thoughts and action on the points of spiritual base, remembering HIM at every step and to being krutadnya towards all who are suppportive to us in our achievenments and otherwise.
  Three cheers to Aai !!!


 4. Hari Om,

  Last year we had done our bookings for Aniruddha Pournima which was a week or two after the Atmabal function. We had seen the prelude and later on the clippings and FB posts. And during the Pournima gathering when the people who attended the function described it, we really felt bad for having missed the 2 day program. The CDs will give us an opportunity to get over the feeling. Desperately waiting for the CDs to land in Muscat. Shree Ram!

  Love the way Aai speaks…. Softly, lovingly and yet very assertively. Hats-off to Her for emphasising the FB's utility.

  Regards,

  Sandeepsinh Mahajan


 5. Hari Om Dada
  Aatmabal Mahotsav was indeed a MEGA event. We all enjoyed it to the Fullest extent and those memories are rejuvenated now having DVD. BIG Shree Ram to dearest Nandai for giving us a blessed treat which all of us would like to cherish through out the life. Hari Om


 6. हरी ओम दादा,

  आईंकडून आत्मबल शिकणे म्हणजे “आनंदाचे डोही आनंद तरंग”

  १३०० सख्यांचा आत्मबल महोस्तव तर खूपच सुंदर होता. आईंच्या मार्गदर्शना खाली झालेला ह्या महोस्तावाची CD कधी येते ह्याची वाट प्रत्येक जण पाहत होते.

  आईने CD launch चा वेळी सोशल मिडिया चे महत्व समजवून सांगितले त्याचवरून कळते आई स्वतः किती updated असते. कारण काही न्यूजपेपर्स आणि न्यूज चॅनल्स‌ त्यांचा फेसबुक पेज वर जगातल्या महत्वाच्या बातम्या जशा घडतात तशा काही क्षणात पोस्ट करत असतात आणि त्यामुळे आपल्याला जगाच्या पाठीवरची कोणीतीही न्यूज काही क्षणात कळते.

  आजच्या जगात इंटरनेट आणि सोशल मिडिया चे वाढलेले महत्व आईने ही अचूक ओळखले आहे. बाळाची पाउले कितीही वाकडी तिकडी पडली तरी जगाबरोबर चालण्यासाठी आपल्या ह्या आईचा आधार नेहमीच आपल्याला मिळत आहे. श्री राम.


 7. हरि ॐ दादा. तुमच्या ह्या पोस्टचे तुम्ही दिलेले शिर्षक अतिशय समर्पक आहे…..’आणि आठवणी पुन्हा जाग्या झाल्या’. खरंच ह्या डिव्हिडी अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व आत्मबल सखींच्या ’आत्मबल महोत्सवाच्या’ आठवणी तर जाग्या झाल्या असतीलच पण त्याचबरोबर आमच्या नंदाईंनी आत्मबल महोत्सव साजरा करण्यासाठी स्वत: घेतलेल्या अविरत कष्टांच्या आठवणीही पुन्हा जाग्या झाल्या. सर्व आत्मबल सखींनी ह्या आत्मबल महोत्सवासाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहेच पण त्यांचा ’ड्रायव्हिंग फोर्स’ असलेली नंदाई – तिचे अहोरात्र श्रम कधीही न विसरता येण्यासारखे आहेत. नंदाईंच्याच कृपेने मला ह्या आत्मबल महोत्सवाच्या प्रॆक्टिसच्या वेळी त्यांच्याबरोबर काहीवेळा जाण्याचा सुयोग जुळून आला होता. अर्थातच नंदाईंच्या आज्ञेनुसार कुठल्याही प्रॆक्टिसकडे ढूंकूनही बघण्याची आम्हाला मुभा नसायची. पण अधुनमधून नंदईंची स्वत:ची चाललेली लगबग दिसत असे. तेरा बॆचेसच्या तेराशे स्त्रियांनी वेगवेगळ्या नाटकांमध्ये, नृत्यांमध्ये भाग घेतलेला होता आणि नंदाईंचे अगदी प्रत्येक स्त्रीकडे जातीने लक्ष असे. नुसता त्यांच्या परफॊर्मन्सकडे नाही, तर एका 'सख्ख्या आईच्या' नात्याने, कुठल्या बाळाने प्रॆक्टिसला आल्यापासून काही खाललेलं नाही, कुठलं बाळ आजारी आहे, कुठल्या बाळाला सादरीकरणासाठी आत्मविश्वासाची गरज आहे, अशा अनेक बाबींकडे नंदाईचे स्वत: लक्ष असे. हे फक्त नंदाईच करू शकते. खरंच नंदाईबद्दल म्हणावसं वाटतं,
  आई तुझ्या मायेने आज तू असंख्य राजहंस घडविलेस
  आत्मबल महोत्सवाच्या निमित्ताने तेराशे राजहंसांना एकत्रही आणिलेस
  सर्व राजहंसांना उंच भरारी घेण्यास पंखांत बळ पुरविलेस
  संपूर्ण आसमंतामध्ये सत्य-प्रेम-आनंदाचे रंग उधळविलेस


 8. “याची देही याची डोळा” हा सोहळा पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच CD कधी येणार ह्याची उत्सुकता होती. आता ती CD कधी पाहायला मिळणार ह्यासाठी आतुर आहोत. रविवारचे फोटो पाहिले असता लक्षात येते कि नंदाई सुद्धा किती जोशात होती, आनंदी होती CD रिलीज करण्यासाठी! तिचे आणि तिच्या वीरांचे परिश्रमच इतक्या भव्य-दिव्य कार्यक्रमासाठी कारणीभूत होते. माझी आई ह्या अविस्मरणीय कार्यक्रमात सहभागी होती ह्याचा मलाही अभिमान आहे. श्रीराम!

  ह्या CD मधील विविध कार्यक्रम खरच इतके सुंदर आहेत आणि इतक काही शिकवणारे आहेत! साक्षात आईचे दिग्दर्शन आणि मार्गदर्शन लाभलेला हा सोहळा, परीस्पर्श झाल्यासारखाच होता. प्रत्येक श्रद्धावानाने ह्याचा लाभ घ्यायलाच हवा!


 9. हरि ॐ दादा,
  रविवारच दिवस खरचं आम्हा सर्व सख्यांसाठी एक पर्वणीच होती…. त्या दिवशीचे माझे शेड्युल खूपच बीझी होते. मला वाटले मला बहुतेक जायलाच मिळणारच नाही. मी तसे मझ्या मैत्रिणींना सांगितलेही होते. एक मन म्ह्णत होते आई येणार आहे तर आपण जायलाच पाहिजे…… परत दिवस खूपच बिझी होता त्यामुळे शक्यताही कमीच होती,,,,, तरी आईला म्हटले माझी इच्छा आहे यायची….. बघुया काय होते ते….. आणि सर्व गो़ष्टी जुळून आल्या मला परत यायला रात्र होणार होती त्याएवजी संध्याकाळ्पर्यंतच झाले….. उशिर झाला होता काय करू कळत नव्हते…… पण शेवटी म्हटले न जाण्यापेक्षा उशिरा जाणे योग्य असे ठरवून शेवटी श्रीहरिगुरुग्रामला पोहोचलेच…… कसे आईने खेचून आणले ते तीच जाणे….. खरचं जर नसते आले तर मग मला किती वाईट वाटले असते?…. शेवटी आईसच काळ्जी……
  आई आली तिने सांगितले की, ‘मी लवकर निघाले होते पण बापूंनीच त्यांच्या लेकींना उशिर झाला आणि आई आधी पोहोचली असती तर त्यांना वाईट (गील्टी) वाटेल म्हणून उशिरा जायला सांगितले.’ खरचं त्यावेळी खूप खूप भरुन आले मला…..
  आता जेव्हा तुम्ही टाकलेली पोस्ट पाहिले आणि राहवले नाही….. लगेच लिहायला बसले…
  तुम्ही टाकलेल्या व्हिडिओमुळे आम्हाला परत आईचे बोल ऐकायला मिळाले. ज्या सख्यांना यायला मिळाले नसेल त्यांनाही खूपच आनंद झाला असेल…… त्यादिवशीचे काही महत्वाचे क्षण त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना परत परत बघायची संधी दिली…… बॅनरचे आईच्या हस्ते झालेले आनावरण, आईचे बोल आणि सिडीचे ओपनींग सर्वच गोष्टी तुम्ही व्हिडिओ शेअर केल्याने बघू आणि अनुभवू शकलो…..
  मला खात्री आहे प्रत्येक सखी ही अशीच खूप खूष असणार आहे या तुमच्या पोस्टमुळे…….खूप खूप श्रीराम…..
  रविवारी आईने आम्हा सर्व लेकींना दिलेल्या संदेशाची नक्कीच आम्ही आठवण ठेऊच आणि आम्ही कधीच रिकामे राहणार नाही….. रविवार २६ ऑगस्टला असलेले वृक्षारोपण आणि पुढे येणारे गुणसंकिर्तन असो आम्ही प्रत्येक कार्यात हिरीरीने नक्कीच सहभाग घेऊ…
  सिडी ओपनिंगची, बॅनरची कल्पना सर्वच एकदम सुंदर होती… आणि राजहंस तर…. काय सांगू…. एवढेच म्हणीन की खूप खूप छान मस्त……श्रीराम…..श्रीराम…. श्रीराम…….


 10. Dada kharach amhi tumche khup abhari aahot.Ahmedabadla aslyamule bapuche pravachan attend karta yet nahi.Pan tumchya ya blog mule
  amhla bapuncha & aaicha aavaj eikalya milto ahe!!!! Thanks a lot!!!!!!!


 11. हरि ओम. दादा. आत्म्बल महोत्सव हा खरोखरच अविस्मरणीय असा खजिना प.पू.आईने आम्हां लेकींसाठी मुक्त हस्ताने उधळला होता. काल आईने आम्हांला पुढील आयुष्य कसे गुणसंकीर्तनाने उज्जवल बनवते याचे प्रत्यंतरच दिले आणि त्याच बरोबर आईने हे मर्म ही सांगितले की गुणसंकीर्तनाने पूर्वायुष्यात घडलेल्या चुकांचे क्षालन होण्यास किती मोठा हातभार लागतो आणि बापू , आईची त्याबद्द्ल १०८% ग्वाही दिली. आई आम्हां सर्वांसाठी किती किती झटते, राबते ह्याचेच दर्शन होते ते जणु. बापूंनीही किती काळजीने आईला उशीरा यायला लावुन पावसात उशीरा पोहचल्याबद्द्ल तिच्या लेकींना खंतही वाटु नये म्हणुन घेतलेली कळ्कळ एका अमर्याद प्रेम लुट्विणार्या पित्याचेच विशाल अंत:करण दावते.
  आम्ही धन्य धन्य झालो असे जननी- जनक , माता-पिता ह्या जन्मी लाभले म्हणुन, त्यांच्या चरणी नित्य शरणागत राहो हीच चण्डिकाकुलाला प्रार्थना की जरी पंखामध्ये आमच्या आईने राजहंसाचे बळ दिले तरी अंह्कार त्याला कधी स्पर्शु नये आणि नीर- क्षीर विवेकाची बुद्धी सतत जागृत राहो!!!!!!श्रीराम!!!!
  सुनीतावीरा करंडे


 12. हरी ओम दादा
  आत्मबल महोत्सवाची डीव्हीडी पाहताना ……खरच आठवणी पुन्हा जाग्या झाल्या… किती दिवसापासून या डीव्हीडीची आतुरतेने वाट पाहत होतो. ऑफिसमुळे दुसर्या दिवसाचा प्रोग्राम
  पाहता आला नाही त्यामुळे नाराज होतो….पण आज डीव्हीडी पाहताना अस वाटल आपण तिथेच आहोत आणि हा प्रोग्राम आपल्या समोर चालू आहे. माझी २ वर्षाची मुलगी (वसुंधरा) सुरवात पाहून झाल्यावर म्हणाली बाबा पुन्हा दत्तबाप्पा बघायचा आहे…..मी मनात म्हटले वसुंधराच्या जीवनातसुद्धा हा क्षण येऊ दे …..
  आईने तिच्या लेकींना विश्वास, खंबीरपणा, बळ, सहनशक्ती, प्रेम आणि भरभक्कम माहेर असल्याची जाणीव दिली आहे. याचा प्रत्यय मी माझ्या घरात दररोज अनुभवतोय.
  श्रीराम


 13. Feeling very proud of our Nandai that she has managed to do all this with her great efforts.
  3 big cheers to P.P Nandai & whole Aatmabal team..
  Hip hip hurray !!!
  Hip hip hurray !!!
  Hip hip hurray !!!


 14. Sundar my mom = perfection+ love + truth + discipline+ many more Mrs Priyankaveera Sawant


 15. हरी ओम दादा,

  खरोखरच आत्मबल महोत्सव एक अविस्मरणीय, अद्भुत असा एक भव्य दिव्य सोहळा होता. दोन्ही दिवस कार्यक्रम attend करून आम्ही हि खूप धम्माल केली, आनंद लुटला.
  होय अक्षरश लुटला.. ते दोन्ही दिवस आज हि अगदी स्पष्ट डोळ्यासमोर आहेत. आणि हीच पर्वणी आता CD रूपाने आपल्या घरात एक खझीना म्हणून सर्वच बापुभक्त ठेवतील हे निश्चित.
  video बघत असताना आई चे शब्द कानावर पडले आणि जे वाटला ते शब्दात मांडता येणार नाही. आणि आईने पण कॉम्पुटर, सोसीअल मिडियाचा वापार वाढवण्याची गोष्ट केली. आजच्या
  जागा बरोबर चालत राहणे हेच बोध आपल्याला दिले आहे.


 16. श्रीराम!
  पूज्य दादा, ही पोस्ट वाचून खूप खूप आनन्द झाला. देवयान पथावर चालत राहून प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळी आनन्दाचा करण्याचे मार्गदर्शन नन्दाई सदैव आम्हा श्रद्धावानांना सहज सोपेपणे करते. प्रत्येकातील राजहंसत्वाची जाणीव करून देण्याचे कार्य परमपूज्य नन्दाई अथकपणे करत असते आणि तिच्या या कार्याची झलकच आत्मबल महोत्सवाद्वारे सर्वांनी अनुभवली.
  एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
  होते कुरूप वेडे, पिल्लू तयात एक.
  एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
  भय वेड पार त्याचे वा-यासवे पळाले
  पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक
  त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक.
  आमच्यातील प्रत्येक जण त्या पिलाप्रमाणेच असतो. आईच्या मायेची पाखर त्या पिलाला राजहंस बनवते. ’हंस: सोऽहम्’ याचा एक आगळावेगळा अर्थ या आत्मबल महोत्सवामध्ये उमगला.
  परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांद्वारे म्हणजेच बापुंद्वारे दिग्दर्शित केल्या गेलेल्या मर्यादाशील भक्तिमार्गावरून चालण्याचे सामर्थ्य आम्हा श्रद्धावान लेकरांना देणा-या माझ्या नन्दाईचरणी माझे लोटांगण! हरि: ॐ !

Leave a Reply